‘हॅरी पॉटर’चा प्रिक्वेल ‘फॅन्टास्टिक बिस्ट’मधून अभिनेता जॉनी डेपची हकालपट्टी करण्यात आली आहे. या सुपरस्टार अभिनेत्यावर त्याची घटस्फोटित पत्नी अभिनेत्री अ‍ॅम्बर हर्ड हिने कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. हे आरोप कोर्टात खरे ठरले आहेत. परिणामी वॉर्नर ब्रोसने आपल्या आगामी प्रोजेक्ट्समधून जॉनी डेपला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला आम्ही काम देणार नाही अशी भूमिका या निर्मिती संस्थेने घेतली आहे.

अवश्य पाहा – अभिनेत्रीनं शेअर केला ‘बाथरुम सेल्फी’; काही तासांत मिळाले ६ लाख व्हूज

जॉनीला ‘फॅन्टास्टिक बिस्ट’मधून काढल्यामुळे चाहते प्रचंड नाराज आहेत. यापूर्वी त्याला डिस्ने स्टुडिओने ‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’ या चित्रपट मालिकेतून काढलं होतं. निर्मात्यांच्या निर्णयामुळे नाराज झालेले चाहते थेट या फ्रेंचाईजीवर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. जॉनी डेप हा एक सुपरस्टार अभिनेता आहे. जगभरातील कोट्यवधी लोक त्याला फॉलो करतात. शिवाय त्याच्या जबरदस्त अभिनयामुळेच पायरेट्स ऑफ कॅरेबियन आणि फॅन्टास्टिक बिस्ट या फ्रेंचाईजी इतक्या लोकप्रिय झाल्या. अन् आता तोच नाही तर चित्रपट कोणासाठी पाहायचा असा प्रश्न चाहते विचारत आहेत. दरम्यान चाहत्यांनी चित्रपटांवर बहिष्कार टाकू नये म्हणून पायरेट्सचे आगामी प्रोजेक्ट पुढे ढकलण्यात आले आहेत.

अवश्य पाहा – नखरे करणं अभिनेत्रीला पडलं भारी; १८ व्या दिवशी मालिकेतून काढून टाकलं

प्रकरण काय आहे?

२०१६ साली अ‍ॅम्बर हर्ड व जॉनी डेप विवाहबद्ध झाले होते. अ‍ॅम्बर हर्ड ही जॉनीची तीसरी पत्नी होती. परंतु पुढे अंतर्गत मतभेदांमुळे वर्षभरातच त्यांचा संसार मोडीस निघाला. गेली चार वर्ष दोघे एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अ‍ॅम्बरने जॉनीवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करत ५० लाख अमेरिकी डॉलरचा दावा ठोकला होता. लंडन उच्च न्यायालयात हा दावा सिद्ध करण्यात अ‍ॅम्बर यशस्वी ठरली आहे.