News Flash

जॉनी लिव्हरच्या मुलीचा डान्सपाहून नेटकऱ्यांनी केली इतर स्टारकिड्सशी तुलना

सध्या तिचा हा जुना व्हिडीओ चर्चेत आहे.

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कॉमेडियन जॉनी लिव्हर यांची मुलगी जॅमी लिव्हर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती सतत सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिचे व्हिडीओ पाहून ती वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत असल्याचे म्हटले जाते. मात्र जॅमीचा आता कॉमेडी करतानाचा नाही तर डान्स करतानाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओत जॅमी मुकाबला या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. जॅमी एक अप्रतिम डान्सर असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओत जॅमीने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, पिवळ्या रंगाचे जॅकेट आणि जीन्स परिधान केली आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. आता पर्यंत हा व्हिडीओ १६ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

जॅमीचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आणि दुसऱ्या बाजूला स्टारकिड्सची खिल्ली उडवली आहे. एक नेटकरी म्हणाला, “ही आलिया, अनन्या आणि अन्य स्टारकिड्स च्या तुलनेत अप्रतिम आहे.” दुसरा म्हणाला, “तुझा प्रत्येक गोष्टीचा अनुभव पाहून मला आनंद झाला, मात्र मला हे समजतं नाही की या मुलीला मुख्य भूमिका का दिली जात नाही.” “तिचे एक्सप्रेशन्स अप्रतिम आहेत” असं म्हणाला. “सध्याच्या घडीला जॉनी लिव्हर यांना त्यांच्या मुलीचा अभिमान वाटत असेल” असं म्हणत आणखी एका नेटकऱ्याने जॅमीची स्तुती केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 4:36 pm

Web Title: johnny lever daughter jamie lever dancing on mukabla song video went viral dcp 98 avb 95
Next Stories
1 ‘ऋषी कपूर यांनी वाचवले होते प्राण’; पद्मिनी कोल्हापुरेंनी सांगितला अंगावर काटा आणणारा ‘तो’ प्रसंग
2 आमिर खानच्या घरी लगीनघाई, इरा खान करते तयारी
3 चाहत्याने केली न्यूड फोटोची मागणी, अभिनेत्रीने उत्तर देत केली बोलती बंद
Just Now!
X