05 June 2020

News Flash

लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल

घराबाहेर पडताच जॉनीसोबत घडला अनोखा किस्सा

भारतात वाढत जाणारा करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या लॉकडाउनच्या दिवसांत विनाकारण घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. असे असताना देखील प्रसिद्ध विनोदवीर जॉनी लिव्हर यांनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र आई ओरडताच जॉनी पुन्हा एकदा घरात जाऊन बसले.

जॉनी लिव्हर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन हा संपूर्ण किस्सा आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला.

“घरात बसून बसून मी कंटाळलो आहे. किती टीव्ही पाहणार?, किती बातम्या ऐकणार?, कुटुंबासोबत किती गप्पा मारणार? म्हणून मी थोडे पाय मोकळे करण्यासाठी घराबाहेर पडलो. इतक्यात माझ्या आईने मला थांबवले. ती माझ्यावर ओरडायला लागली. रागावलेली आई पाहून मी घाबरलो आणि शांतपणे घरात जाऊन बसलो.” असं म्हणत जॉनीने तो गंमतीशीर किस्सा आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला.

जॉनी लिव्हर कधी काळी बॉलिवूडमधील विनोदाचे बेताज बादशाह म्हणून ओळखले जायचे. त्यांचा रुपेरी पडद्यावरील विनोद पाहून लोक खळखळून हसायचे. मात्र गेल्या काही काळात ते चित्रपटांपासून काहीसे दूर आहेत. तसेच सोशल मीडियावरही ते फारसे सक्रिय नसतात. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा इन्स्टाग्रामवरील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी तर आपल्या आईचं ऐका आणि घरातच राहा असाही सल्ला त्यांना दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2020 5:35 pm

Web Title: johnny lever funny video viral about coronavirus lockdown mppg 94
Next Stories
1 “लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण?” पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न
2 Coronavirus : क्वारंटाइनमध्ये करायचं काय? देवदत्त नागेने काढला भन्नाट उपाय
3 फराह खाननं सुनावताच प्रकाश जावडेकरांनी ‘ते’ ट्विट केलं डिलीट
Just Now!
X