01 March 2021

News Flash

‘हाऊसफुल ४’मध्ये हास्याचा डबल धमाका; मुलीसोबत जॉनी लिव्हर झळकणार

जेमी लिव्हरही हाऊसफुलमध्ये पाहायला मिळणार आहे.

तिची बरीचशी दृश्य ही वडील जॉनी, अक्षय कुमार आणि रितेश देशमुखसोबत असणार आहेत

अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सॅनॉन, पूजा हेगडे अशी एकापेक्षा एका तगडी स्टारकास्ट असलेला हाऊसफुल ४ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात बॉलिवूडमधले हास्यसम्राट जॉनी लिव्हर आणि त्यांची मुलगी जेमी लिव्हरही पाहायला मिळणार आहे.

बाप- लेकीचा हास्याचा डबल धमाका हाऊसफुल ४ मध्ये पाहायला मिळणार आहे . एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार जेमी लिव्हर ही विनोदी भूमिकेत झळकणार आहे. तिची बरीचशी दृश्य ही वडील जॉनी, अक्षय कुमार आणि रितेश देशमुखसोबत असणार आहेत. जेमी सध्या वडील जॉनी लिव्हर यांच्याकडून अभिनयाचे धडे घेत आहे.

अनेक बॉलिवूड चित्रपटात जॉनी लिव्हर यांनी विनोदी भूमिका साकारल्या आहेत. जॉनी यांनी आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगनं प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. त्यामुळे साहजिकचं जेमीवर देखील दडपण असणार आहे. विशेष म्हणजे हाऊसफुल ४ या कॉमेडी चित्रपटात बाप लेकीच्या या जोडीला पाहण्यास सगळेच उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2019 3:45 pm

Web Title: johny and and his daughter jamie lever join housefull 4
Next Stories
1 भारत-पाक तणावामुळे दिलजीतने पुढे ढकलला मादाम तुसाँमधील अनावरण सोहळा
2 या सात अभिनेत्रींनी धुडकावली होती ‘कुछ कुछ होता है’ची ऑफर
3 सर्वोत्तम पती होण्यासाठी काय करावं? करिनाने दिला रणवीरला सल्ला
Just Now!
X