News Flash

खिलाडी कुमार असा साजरा करणार त्याचा बर्थडे

अक्षय 'जॉली एलएलबी' सिनेमाच्या सिक्वेलमध्ये व्यस्त आहे

अक्षय कुमारसाठी हे वर्ष खूप चांगले गेले

सध्या जॉली ‘एलएलबी २’च्या शुटिंगमध्ये व्यस्त असणारा अक्षय कुमार आपल्या वाढदिवसासाठी काही खास आयोजन करत आहे. यावेळी तो आपली पत्नी ट्विंकलसोबत निवांत क्षण घालवण्याचा विचार करत आहे. त्यामुळे यंदाचा वाढदिवस तो परदेशात साजरा करण्याच्या विचारात आहे. ट्विंकल आणि अक्षय नक्की कुठे जाणार हे अजून कळलेलं नाहीए. तरी ते दोघे फिरण्यासाठी बाहेर जाणार हे मात्र नक्की झालं आहे. खिलाडी कुमार ट्विंकलसोबत खाजगी विमानातून परदेशात जाणार आहे अशी चर्चा सुरु आहे.
अक्षय कुमारसाठी हे वर्ष खूप चांगले गेले. यावर्षी त्याचे ‘एअरलिफ्ट’, ‘हाऊसफुल-३’, ‘रुस्तम’ हे तीन सिनेमे हिट ठरले आहेत. त्यामुळे तो त्याचा वाढदिवस थोडा हटके साजरा करणार यात काही शंका नाही. ‘रुस्तम’ हा सिनेमा १२ ऑगस्टला प्रदर्शित झाला होता. या सिनेमाबरोबरच हृतिक रोशनची महत्त्वाची भूमिका असणारा ‘मोहेंजोदारो’ हा सिनेमाही प्रदर्शित झाला होता. पण प्रेक्षकांनी हृतिक रोशनच्या सिनेमापेक्षा अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’ सिनेमाला पसंती दिली.
सध्या अक्षय २०१३ मध्ये आलेला ‘जॉली एलएलबी’ सिनेमाच्या सिक्वेलमध्ये व्यस्त आहे. आधी या सिनेमात अर्शद वारसी आणि बोमन इरानी यांची जोडी पाहायला मिळाली होती. पण या सिक्वेलमध्ये आता अक्षयसोबत अन्नु कपूर, सैरभ शुक्ला आणि अन्य कलाकार दिसतील. या सिनेमात अर्शद वारसीची विशेष उपस्थिती असणार आहे. शिवाय ‘जॉली एलएलबी २’ मध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीही असणार आहे. या सिनेमाचे शुटिंग लखनऊमध्ये सुरु होते. तिकडच्या जेवणाचा आस्वाद घेत अक्षयने काही फोटो सोशल मीडियावर शेअरही केले आहेत.

Next Stories
1 आशुतोष गोवारीकर यांनी माफी मागावी, पाकिस्तानी मंत्र्यांची मागणी
2 आशाताईंना वाढदिवशी राधिका देणार खास ‘गिफ्ट’
3 वाढदिवसा दिवशीही कामात व्यस्त होती राधिका
Just Now!
X