28 January 2020

News Flash

‘लोकांकिका’ ते ‘सैराट’ व्हाया नागराज मंजूळे

‘लोकांकिका’च्या पहिल्याच पर्वात राज्यभरातील आठ विविध केंद्रांवर अनेक मान्यवर मराठी कलाकार आणि दिग्दर्शकांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं होतं.

| August 16, 2015 05:17 am

‘लोकांकिका’च्या पहिल्याच पर्वात राज्यभरातील आठ विविध केंद्रांवर अनेक मान्यवर मराठी कलाकार आणि दिग्दर्शकांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं होतं. ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या रंगमंचावर वेगवेगळ्या विषयांची मांडणी करणाऱ्या या नवख्या तरूणाईच्या जबरदस्त सादरीकरणाची या मान्यवरांनीही दखल घेतली आणि त्यांच्या पारखी नजरेतून निवडलेले काही कलाकार थेट चित्रपटापर्यंत पोहोचले. पुण्याच्या ‘आयएलएस लॉ’ महाविद्यालयाच्या अनुजा मुळयेला तर या पहिल्याच एकांकि केच्या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजूळे यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. ‘सॉफ्टकॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या पहिल्या पर्वात पुण्याच्या ‘आयएलएस लॉ’ महाविद्यालयाने सादर केलेली ‘चिठ्ठी’ ही सवरेत्कृष्ठ लोकांकिका ठरली. पुण्याला झालेल्या विभागीय अंतिम फे रीत ही एकांकिका सादर झाली तेव्हा त्यांच्यासमोर त्यांचे परीक्षण करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी दिग्दर्शक नागराज मंजूळे उपस्थित होते. या एकांकिकेत अनुजाचं काम पाहिलेल्या नागराजनी तिला त्यानंतर आपल्या आगामी ‘सैराट’ या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी बोलावून घेतलं. आज अनुजा या चित्रपटात काम करते आहे. एकांकिकेत केलेल्या कामाच्या बळावर अनुजाला खुद्द नागराज मंजूळेंच्या मार्गदर्शनाखाली काम करायची संधी मिळाली आहे.माझं शिक्षण सदाशिव पेठेत नूतन मराठी विद्यालयात झालं आणि आता मी ‘आयएलएस लॉ’ महाविद्यालयात दुसऱ्या वर्षांला शिकते आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’त प्रवेश घेण्याआधी आम्ही ‘पुरूषोत्तम करंडक’ला ही एकांकिका सादर केली होती. पण, ‘लोकांकिका’चं पहिलंच वर्ष असूनही ज्या पध्दतीने त्यांनी पूर्ण महोत्सवाचं नियोजन केलं होतं, स्पर्धेचं स्वरूप त्याचं आयोजन या सगळ्या गोष्टी इतक्या अचूक आणि योग्य आहेत की त्यात अमूक काही उणीव काढायची संधीच नाही आहे. ‘चिठ्ठी’ आम्ही सादर केली पुणे केंद्रावर तेव्हा नागराज तिथे परीक्षक होते. त्यांनी ऑडिशनसाठी बोलावलं तेव्हाच मला खरंतर खूप आनंद झाला होता. मी दोनदा ऑडिशन्स दिल्या आणि आत्ता त्यांच्याबरोबर काम करते आहे. हा अनुभव माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खरंच आनंदाचा आणि आश्चर्याचा होता. इतक्या कमी वेळात चित्रपटात काम करायला मिळेल आणि तेही नागराज मंजूळे यांच्या चित्रपटात अशी कल्पना मनात येणंही अशक्य होतं. इथे मात्र ते ‘लोकांकिका’मुळे साध्य झालं. ‘सैराट’च्या सेटवरही मला इतकी चांगली वागणूक मिळते आहे की आम्ही काहीतरी मोठा चित्रपट करतो आहोत. मला कॅमेऱ्याचं काही ज्ञान नाही आहे आणि समोर नागराज मंजूळे आहेत, अशी भीती त्यांनी कधी वाटू दिली नाही. इतक्या सहजतेने माझ्याकडून ते काम करून घेतलं जातं आहे. त्यामुळे, नविन कलाकारांसाठी एक विश्वासपूर्ण कामाची संधी ‘लोकांकिका’ने उपलब्ध करून दिली आहे.

अनुजा मुळ्ये

 

‘लोकसत्ता’ची तळमळ पहिल्याच पर्वात जाणवली
आपल्याकडे एकांकिका आणि नाटय़स्पर्धा खूप आहेत पण, त्या सगळयाच काही टिकून राहिलेल्या नाहीत. पण, राज्याच्या कानाकोपऱ्यातील नव्या कलाकारांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं ही ‘लोकसत्ता’ची तळमळ ‘लोकांकिका’च्या पहिल्याच पर्वात जाणवली. मुलांमध्ये गुणवत्ता असते. त्यांच्याकडे हुशारीही खूप असते. पण, त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळणं गरजेचं असतं. कधी कधी मुलांची मांडणी चांगली असते पण, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. ‘लोकांकिका’मध्ये परीक्षक या नात्याने मुलांचे काम पाहताना ते किती गांभिर्याने मांडणी करत आहेत हे दिसून येत होतं. पण, त्यांना अभिनय क्षेत्रात येण्यासाठी जे व्यासपीठ उपलब्ध व्हावं लागतं ते ‘लोकांकिका’च्या रूपाने त्यांना मिळालं आहे. ‘लोकसत्ता’ने सुरूवात चांगली केली आहे. दुसऱ्या पर्वातही त्याचे उन्नत स्वरूप पहायला मिळेल, अशी खात्री आहे.
-नागराज मंजूळे

First Published on August 16, 2015 5:17 am

Web Title: journey of drama to sairat
Next Stories
1 नात्यांमधली बांधीलकी जपायला हवी हे ठसवणारी गोष्ट
2 ‘डबल सीट’सारखा चित्रपट ही तर काळाची गरज
3 ‘जरा हवा येऊ द्या’
Just Now!
X