टेलिव्हिजन विश्वात नावारुपास आल्यानंतर बऱ्याच कलाकार मंडळींनी त्यांचा मोर्चा बॉलिवूडकडे वळवला. अशाच कलाकारांच्या यादीत आता अभिनेत्री मौनी रॉयचाही समावेश झाला आहे. बऱ्याच काळापासून मौनीला सलमान खान त्याच्या चित्रपटातून लॉन्च करणार असल्याचं म्हटलं जात होतं. अशाही चर्चा रंगल्या होत्या की, ही अभिनेत्री खिलाडी अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. मौनी कोणत्या अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणार यावर प्रश्नचिन्ह कायम असलं तरीही ती बॉलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

आतापर्यंतच्या कारकिर्दीत आज मौनी ज्या वळणावर उभी आहे, त्या ठिकाणाहून मागे वळून पाहिलं असता तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाचं सुरेख चित्र पाहायला मिळतं. मौनीने २००७ मध्ये एकता कपूरच्या ‘क्यों की सास भी कभी बहू थी’ या मालिकेपासून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. या मालिकेनंतर तिने काही रिअॅलिटी शोमध्येही सहभागी होत प्रेक्षकांची मनं जिंकली.

ayesha jhulka, High Court, Pet Dogs Killing, Ayesha Jhulka Moves High Court, Seeking Expedited Justice, ayesha jhulka pet dog killed, ayesha jhulka dog killed case, mumbai high court, mumbai news,
हत्या झालेल्या श्वानाला न्याय मिळवून देण्यासाठी अभिनेत्री आयेशा जुल्का उच्च न्यायालयात
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
Kangana Ranut and surpiya
काँग्रेसच्या महिला नेत्याने पोस्ट केलेल्या कंगनाच्या ‘त्या’ फोटोवरून वादंग; अभिनेत्री म्हणाली, “वेश्याव्यवसाय करणाऱ्या…”
sanket korlekar sister uma debut on star pravah new serial sadhi mansa
‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत झळकली प्रसिद्ध अभिनेत्याची बहीण; फोटो शेअर करत म्हणाला, “तू पहिल्यांदा टीव्हीवर…”

mouni-roy

मौनीने ‘पती पत्नी और वो’, ‘दो सहेलिया’ आणि ‘शsss फिर कोई है’ या मालिकांतून अभिनय करत टेलिव्हिजन विश्वात स्वत:चं स्थान निर्माण केलं. ‘देवों के देव महादेव’ या मालिकेतील तिची भूमिका विशेष गाजली होती. या मालिकेदरम्यानच मौनीचं नाव मोहित रैनासोबत जोडलं गेलं होतं. कालांतराने मोहित आणि मौनीच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चाही शमल्या.
mahadev

अभिनयासोबतच मौनी नृत्यकलेतही पारंगत आहे. यासोबतच तिने एका रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालनही केलं आहे. त्यामुळे चौकटीतील विश्वातच समाधान न मानता आपल्या कक्षा रुंदावण्याला प्राधान्य देणाऱ्या या अभिनेत्रीच्या चाहत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.
mouni