जिथे पाहा तिथे सध्या आयफा पुरस्कार सोहळ्याचीच चर्चा आहे. कोणत्या कलाकारांनी कसे कपडे घातले, ग्रीन कार्पेट, रेड कार्पेटवर कोण कोण आलेलं हे पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यातही त्यांचे आवडते कलाकार जर परफॉर्म करणार असतील तर मग सोन्याहून पिवळच. सलमान खान, आलिया भट्ट, कटरीना कैफ, वरुण धवन, शाहिद कपूर आणि इतर सुपरस्टार्सनी या सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली होती. पण या सगळ्यांमध्ये चाहत्यांचे मन जिंकले ते फक्त सलमान खानने. भाईजानने त्याच्या हटके परफॉर्मन्समधून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारडे फेडले. त्याने कतरिनाला आपल्या परफॉर्मन्सद्वारे अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

जाणून घ्या भारतात कधी आणि किती वाजता प्रदर्शित होणार ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा नवा सिझन

या पुरस्कार सोहळ्यात सलमानला अशा एका व्यक्तीने कंपनी दिली ज्याचा तुम्ही आधी विचारही करु शकला नसता. ‘जुडवा’ सिनेमाचा स्टार सलमान आणि ‘जुडवा २’ सिनेमाचा हिरो वरुण धवन ‘टन टना टन’ गाण्यावर एकत्र डान्स करताना दिसले.

‘जुडवा २’ या सिनेमात सलमान पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. या गाण्याच्या परफॉर्मन्समधूनच या दोघांमधील अनोखी केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. कलर्स टिव्हीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या दोघांच्या गाण्याचा एक छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे. या दोघांना एकत्र नाचताना पाहून या सिनेमाची उत्सुकता अजूनच वाढली आहे.

‘जुडवा २’ सिनेमात ‘टन टना टन’ या गाण्यावर वरुण, तापसी आणि जॅकलीन डान्स करणार आहेत. काही दिवसांपूर्वी हे तिघं या गाण्याचा सराव करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला होता. अभिजीत भट्टाचार्य आणि पौर्णिमाच्या आवाजातील या गाण्याला अनू मलिकने संगीतबद्ध केले होते. या गाण्याव्यतिरिक्त आधीच्या सिनेमातील ‘उची हैं बिल्डिंग’ हे अन्य गाणंदेखील सिक्वलमध्ये वापरण्यात येणार आहे. प्रेम आणि राज ही दुहेरी भूमिका साकारण्याबाबत सलमानने काही सल्ला दिला का, असा प्रश्न अलिकडेच वरुणला विचारण्यात आला होता. यावर, ‘ओव्हर स्मार्ट’पणा न करता केवळ वडिलांचेच (दिग्दर्शक डेव्हिड धवन) ऐकण्याचा सल्ला सलमानने दिल्याचे वरुण म्हणालेला.

सनी लिओनीच्या गाण्यावर क्रिस गेलने केला डान्स आणि म्हटले…

दरम्यान, वरुणने पहिल्यांदाच आयफा पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी त्याला ‘ढिशूम’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकाराचा पुरस्कार मिळाला.