News Flash

जुगल हंसराजने बांधली जास्मिनशी लग्नगाठ

अभिनेता आणि दिग्दर्शक जुगल हंसराज आणि त्याची पार्टनर जास्मिनचा मिशिगनमधील एका खासगी कार्यक्रमात लग्नसोहळा पार पडला.

| July 7, 2014 04:23 am

अभिनेता आणि दिग्दर्शक जुगल हंसराज आणि त्याची पार्टनर जास्मिनचा मिशिगनमधील एका खासगी कार्यक्रमात लग्नसोहळा पार पडला. जुगलचा मित्र उदय चोप्राने या नवीन जोडप्याला टि्वटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. माझा मित्र जुगल हंसराजने ऑकलंड मिशिगनमध्ये जास्मिनशी काल लग्न केले. नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा, असा संदेश उदयेने टि्वट केला आहे. नसिरुद्दीन शाह आणि शबाना आझमीच्या ‘मासूम’ या १९८३च्या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलेल्या जुगलने ‘मासूम’ चित्रपटात त्याच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या उर्मिला मातोंडकरबरोबर तरूणपणात १९९४ साली ‘आ गले लग जा’ हा चित्रपट केला. एक हिरो म्हणून हा त्याचा पहिलाच चित्रपट होता. २००८ साली आलेल्या ‘रोडसाईड रोमियो’ या अॅनिमेशनपटाचा तो लेखक आणि दिग्दर्शक होता. ‘यश राज फिल्म्स’ आणि ‘वॉल्ट डिस्ने स्टुडिओ’ यांनी संयुक्तरित्या या चित्रपटाची निर्मिती केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 4:23 am

Web Title: jugal hansraj marries partner jasmine
Next Stories
1 पाहाः ‘लय भारी’ सलमान ‘भाऊ’
2 ‘सिंघम रिटर्न्स’चे मोबाईल अॅप!
3 ‘दयाबेन’च्या गरब्याच्या ठेक्यावर ‘सीआयडी’ नाचणार
Just Now!
X