17 January 2021

News Flash

‘मी केबीसीमध्ये पोहोचले’, जुही चावलाचे ट्विट व्हायरल

जुहीचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या केबीसीचे १२ वे पर्व सध्या चर्चेत आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने ट्विट करत ती शोमध्ये पोहोचली असल्याचे म्हटले आहे. सध्या तिचे हे ट्विट चर्चेत आहे.

नुकताच जुही चावलाने एक ट्विट करत केबीसीमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांनी एक प्रश्न विचारलेला दिसत आहे. या पैकी कोणत्या अभिनेत्रीचे नाव एका फुलाचे देखील नाव आहे? त्याला पर्याय A. करिश्मा, B. जुही, C. करीना आणि D. जया असे देण्यात आले आहेत. या प्रश्नाचा स्क्रीन शॉट जुहीने शेअर केला आहे.

हा स्क्रीन शॉट शेअर करत तिने ‘पाहा. मी केबीसीच्या यंदाच्या सीझनमध्ये पोहोचली आहे. टेकनिकली हॉटसीटवर नाही पण किमान प्रश्नाच्या स्वरुपात तेथे पोहोचली आहे’ या आशयाचे ट्विट जुहीने केले आहे. हे ट्विट तिने अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीला देखील टॅग केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 7:49 pm

Web Title: juhi chawla funny tweet on kbc 12 question avb 95
Next Stories
1 VIDEO: ‘करोना अद्याप गेलेला नाही’; अभिनेत्री शिकवतेय मास्क वापरण्याची योग्य पद्धत
2 सोनू सूदने स्वीकारलं चाहतीच्या लग्नाचं आमंत्रण; पोस्ट शेअर करत म्हणाला…
3 वडिलांसाठी गायक कुणाल शर्माने काढला कपिल शर्माच्या नावाचा टॅट्यू
Just Now!
X