News Flash

PHOTO : जुही चावलाच्या मुलीचा फोटो पाहिलात का?

जुहीच्या मुलांना चित्रपटांमध्ये काही रस नाही.

जुही चावला

आजकाल सोशल मीडियावर स्टार किड्सचीच जोरदार चर्चा होताना दिसते. सैफ अली खानचा तैमुर असो किंवा श्रीदेवीची मुलगी जान्हवी, त्यांच्या लहानसहान गोष्टी सोशल मीडियावर ट्रेण्ड होतात. परंतु, असेही काही स्टार किड्स आहेत ज्यांची कधीच कुठे चर्चा नसते, ज्यांना लाइमलाइटमध्ये राहायला आवडत नाही. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री जुही चावलाची मुलगी जान्हवी.

जुहीला जान्हवी आणि अर्जुन ही दोन मुले आहे. सोशल मीडियावर फार क्वचितच ती या दोघांचे फोटो पोस्ट करते. या दोघांनाही प्रसारमाध्यमे आणि झगमगाटापासूनच दूर ठेवण्याचे तिने पसंत केले. नुकताच तिने जान्हवीचा एक सुरेख फोटो ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. जान्हवीच्या लहानपणीचा हा फोटो असून जुही जणू त्या आठवणींमध्येच रमली आहे. ‘जान्हवीला हा फोटो सापडला. मुलं किती लगेच मोठी होतात हे कळतच नाही. गोड आठवणी…,’ असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं.

वाचा : ६८ दिवसांचा तो नियम ‘फुकरे रिटर्न्स’ला का नाही?

जान्हवीने शाळेत पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवलं होतं, तेव्हा जुहीने तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तिच्या मुलांना चित्रपटांमध्ये काही रस नाही, हे जुहीने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. जान्हवीचं मुंबईत शिक्षण झालं. पुढील शिक्षणासाठी तिला लंडनला पाठवण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2017 1:30 pm

Web Title: juhi chawla shares an adorable picture with her baby daughter jahnavi mehta
Next Stories
1 ६८ दिवसांचा तो नियम ‘फुकरे रिटर्न्स’ला का नाही?
2 …म्हणून दीपिकाला साथ देण्यास कंगनाचा नकार
3 ‘टायटॅनिक’ची विशी अन् ‘जेम्स’चा थ्रीडी चष्मा
Just Now!
X