अभिनेत्री जुही चावलाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती विमानतळावर उभी असल्याचं दिसत असून तिच्या मागे लोकांची खूप गर्दी जमलेली पाहायला मिळत आहे. विमानतळावर लोकांना खूप वेळ वाट पाहत थांबावं लागतंय, हे दाखवत तिने हे ट्विट केलं आहे. त्याचप्रमाणे तिने विमान प्राधिकरण व शासकीय अधिकाऱ्यांना मदतीची विनंती केली आहे.
‘विमानतळ आणि शासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी एअरपोर्ट हेल्थ क्लिअरन्सजवळ त्वरित अधिकाधिक काऊंटर व कर्मचारी नियुक्त करावेत. विमानातून उतरल्यानंतर इथे प्रवाशांना तासनतास थांबावं लागतंय. ही अत्यंत दयनीय आणि लज्जास्पद अवस्था आहे,’ असं ट्विट जुहीने केलंय.
Request the Airport and Govt authorities to IMMEDIATELY deploy more officials and counters at the Airport Health clearance … all passengers stranded for hours after disembarking .. … flight after flight after flight …..Pathetic , shameful state ..!!@AAI_Official pic.twitter.com/rieT0l3M54
— Juhi Chawla (@iam_juhi) November 11, 2020
विमानातळावर गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा भंग होऊ नये म्हणून विमानतळ प्रशासनाने त्वरित उपाय करावेत अशी विनंती तिने या ट्विटमधून केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 11, 2020 6:11 pm