७० च्या दशकात प्रदर्शित झालेला ‘ज्युली’ चित्रपट आठवतोय का? त्या काळात बोल्ड चित्रपटाची संकल्पना सुरु झाली ती याच चित्रपटामुळे. त्यानंतर काही वर्षांपूर्वीच नेहा धुपियाने ‘ज्युली’ हा चित्रपट केला. या चित्रपटाचा सिक्वल ‘ज्युली २’ आता लवकरच येत आहे. नुकताच ‘ज्युली २’चा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. मात्र, यावेळी नेहा धुपियाऐवजी दाक्षिणात्य अभिनेत्री राय लक्ष्मी ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. राय लक्ष्मी या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय. दिपक शिवदासानी दिग्दर्शित ‘ज्युली २ ‘ १२ ऑगस्टला प्रदर्शित होईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 15, 2016 12:37 pm