माणसाचं अस्तित्व निर्माण होण्यापूर्वी महाकाय डायनासॉर्सने पृथ्वीवर राज्य केलं होतं. परंतु हे प्राणी दिसायचे कसे? वागायचे कसे? त्यांचा आवाज कसा होता? याची अख्या जगाला ओळख करुन दिली ती ‘ज्युरासिक पार्क’ या चित्रपटाने. दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्ग यांनी या अफलातून सायंन्स फिक्शनपटाची निर्मिती केली होती. १९९३ सालचा हा चित्रपट पाहून आजही आपल्याला आश्चर्य वाटतं. परंतु या चित्रपटातील एक चूक तब्बल २७ वर्षानंतर प्रेक्षकांच्या लक्षात आली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे चित्रपटाचं एडिटिंग करताना दिग्दर्शकालाही जे दिसलं नाही ते एका प्रेक्षकाने शोधून काढलं आहे.

‘ज्युरासिक पार्क’मध्ये एक सीन आहे, ज्यामध्ये डायनासॉर दोन लहान मुलांचा पाठलाग करतो. ही मुलं स्वत:चा जीव वाचवण्यासाठी एका हॉटेलच्या किचनमध्ये जाऊन लपतात. त्यावेळी मुलांचा पाठलाग करणारा तो प्राणी जेव्हा किचनच्या दरवाज्यावर येऊन थांबतो तेव्हा पाठिमागून कोणीतरी त्याची शेपटी वर करतो. या सीनमध्ये डायनॉरची शेवटी खाली पडू नये म्हणून एका व्यक्तीने पाठिमागून ती पकडली होती. एडिटिंगमध्ये झालेली ही चूक एका प्रेक्षकाने शोधून काढली.

मूव्ही डिटेल्स सब फॉर्म या वेबसाईटने रेडीटवर ज्युरासिक पार्कची एक व्हिडीओ क्लिप अपलोड केली होती. या क्लिपच्या कॉमेंटमध्ये एका प्रेक्षकाने ही चूक लक्षात आणून दिली. २७ वर्षांपूर्वी VFX हा प्रकार नव्हता. त्यामुळे सायंन्स फिक्शन चित्रपटांमध्ये लाईव्ह अॅक्शन मॉडेल्सचा वापर केला जायचा. अर्थात ‘ज्युरासॅक पार्क’मध्येही डॉयनॉसॉर दाखवण्यासाठी त्यावेळी मॉडेल्सचाच वापर करण्यात आला होता. त्यावेळी चित्रीकरणादरम्यान ही लहानशी चूक कॅमेरात कैद झाली. आणि तब्बल २७ वर्षानंतर एका प्रेक्षकाने ती चूक शोधून काढली.