बॉलीवूडपटांची वाट जितक्या आतुरतेने पाहिली जाते तितक्याच आतुरतेने आपण आता हॉलीवूडपटांचीही वाट पाहात असतो. याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ होय. या सुपरहिरोपटाने फक्त तीन दिवसांत १०० कोटींचा आकडा पार केला होता. याशिवाय गेल्या काही वर्षांत ‘द जंगल बुक’, ‘स्पायडरमॅन: होमकमिंग’, ‘थॉर राग्नारोक’, ‘वंडर वुमन’ यांसारखे अनेक हॉलीवूडपट येऊन गेले ज्यांनी आपल्या बॉलीवूड व प्रादेशिकपटांना लाजवेल अशी कमाई करून दाखवली आहे. याच पाश्र्वभूमीवर आता आगामी अ‍ॅक्शनपट ‘ज्युरासिक वर्ल्ड: फॉलन किंडम’ सर्वात पहिल्यांदा भारतात प्रदर्शित होणार आहे.

अक्राळविक्राळ डायनासोर व त्यांच्या धमाल अ‍ॅक्शनने भरलेला ‘ज्युरासिक वर्ल्ड’ अमेरिकेत २२ जूनला प्रदर्शित होणार आहे. परंतु भारतात हॉलीवूडपटांची वाढत जाणारी लोकप्रियता पाहता तो दोन आठवडे आधीच म्हणजे ७ जूनला भारतात प्रदर्शित केला जाणार आहे.

आजवर डायनासोर या संकल्पनेवर आधारित ‘नाइट इन द म्युझियम’, ‘लँड ऑफ द लॉस्ट’, ‘अ‍ॅडव्हेंचर इन डायनासोर सिटी’, ‘द लँड दॅट टाइम’ यांसारखे अनेक चित्रपट येऊन गेले. परंतु याची सुरुवात खऱ्या अर्थाने केली ती १९६० साली ‘द लॉस्ट वर्ल्ड’ या चित्रपटाने. पुढे १९९३ साली ‘ज्युरासिक पार्क’ आला. या चित्रपटाने डायनासोरकडे बघण्याचा आपला पारंपरिक दृष्टिकोन पार बदलून टाकला. ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या ‘ज्युरासिक पार्क’ने तुफान लोकप्रियता मिळवली. पुढे चाहत्यांच्या आग्रहाखातर ‘द लॉस्ट वर्ल्ड: ज्युरासिक पार्क’, ‘ज्युरासिक पार्क ३’, ‘ज्युरासिक वर्ल्ड’ अशी एक चित्रपट मालिकाच सुरू झाली.

‘ज्युरासिक वर्ल्ड: फॉलन किंडम’ हा याच मालिकेतला पाचवा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘ए. जे. बायोना’ने केले असून यांत ‘ब्राइस डॅलस हॉवर्ड’ व ‘ख्रिस प्रेट’ हे सुपरस्टार कलाकार आहेत.  दुसऱ्या सत्रात कथानकाचा घसरलेला दर्जा तिसऱ्या सत्रात आणखीनच खाली गेला. परिणामी तिसऱ्या सत्राला ०.५ टीआरपी सकट फक्त ३० लाख व्ह्य़ूज मिळाले. तसेच प्रत्येक भागानंतर मिळणारे व्ह्य़ूज आणि जाहिराती दर कमी होत आहेत. त्यामुळे एबीसी वाहिनीने फक्त १३ भागानंतरच मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या बातमीमुळे नाराज झालेल्या प्रियांकाच्या चाहत्यांनी समाजमाध्यमांवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. परंतु आपल्या प्रत्येक ध्येय धोरणांबद्दल चाहत्यांना माहिती देणाऱ्या प्रियांकाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.