18 October 2018

News Flash

Jurassic World- Fallen Kingdom teaser : डायनासोरचा थरार पुन्हा एकदा अनुभवायला तयार राहा

पुढच्या वर्षी जूनमध्ये प्रदर्शित होणार चित्रपट

'ज्युरॅसिक वर्ल्ड : फॉलन किंग्डम'

‘ज्युरॅसिक पार्क’ या स्टिव्हन स्पिलबर्ग दिग्दर्शित चित्रपटाने १९९३ साली लोकप्रियतेचे शिखर गाठले होते. हा अमेरिकन सायन्स फिक्शन प्रकारातला चित्रपट होता. ‘ज्युरॅसिक पार्क’ सीरिजमधील चौथा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘ज्युरॅसिक वर्ल्ड : फॉलन किंग्डम’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकतेच त्याचे टीझर प्रदर्शित झाले आहे.

‘युनिव्हर्सल पिक्चर्स इंडिया’च्या युट्यूब चॅनलवर हा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा आहे. ‘पळायला तयार राहा..’ अशी टॅगलाइन या टीझरमध्ये पाहायला मिळतेय. १५ सेकंदांच्या या टीझरमध्ये विशालकाय डायनासोर आणि त्यांनी केलेला विध्वंस याची झलक दाखवण्यात आली आहे. यामध्ये क्रिस प्रॅट मुख्य भूमिकेत आहे. तर जेफ गोल्डब्लम, ब्राइस डलास हॉवर्ड यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. विशालकाय डायनासोरवरच्या या हॉलिवूड चित्रपटांच्या सीरिजची भारतातही क्रेझ पाहायला मिळते. येत्या शुक्रवारी याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वाचा : सुशांत-सारासाठी मुंबईत उभारलं ‘केदारनाथ’

१९९३ मध्ये ‘ज्युरॅसिक पार्क’नंतर १९९७ मध्ये ‘द लॉस्ट वर्ल्ड : ज्युरॅसिक पार्क’, २००१ मध्ये ‘ज्युरॅसिक पार्क ३’ आणि २०१५ मध्ये ‘ज्युरॅसिक वर्ल्ड’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. ‘ज्युरॅसिक वर्ल्ड’मध्ये बॉलिवूड अभिनेता इरफान खाननेही भूमिका साकारली होती. ‘ज्युरॅसिक वर्ल्ड: फॉलन किंग्डम’ हा चित्रपट पुढच्या वर्षी जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे.

First Published on December 5, 2017 6:34 pm

Web Title: jurassic world fallen kingdom teaser released