X
X

Photo : जस्टिन बिबर दुसऱ्यांदा विवाहबंधनात!

READ IN APP

दुसऱ्यांदा झालेल्या या लग्नसोहळ्यामध्ये १५४ नातेवाईक व जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते

पॉप संगीत क्षेत्रात आपली वेगळी अशी ओळख प्रस्थापित करणारा पॉप स्टार जस्टिन बिबर सध्या बराच आनंदात आहे. जस्टिनने सोशल मीडियावर केलेली पोस्ट पाहता त्याच्या आनंदाचा अंदाज लावणं सहज शक्य होत आहे. त्याच्या आनंदास कारण ठरतय ते म्हणजे त्याने पुन्हा केलेलं लग्न. जस्टिनने मॉडेल हिली बाल्डविनसोबत पुन्हा एकदा दुसरं लग्न केलं आहे. या दुसऱ्या लग्नाचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या दोघांची एंगेजमेंट अ‍ॅनिव्हर्सरी असल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दुसऱ्यांदा झालेल्या लग्नसोहळ्यामध्ये १५४ नातेवाईक आणि जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसापासून या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या अनेक चर्चा होत्या. मात्र पुन्हा लग्न करुन या दोघांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.


दरम्यान, या लग्नामध्ये हिलीने पांढऱ्या रंगाचा वेडिंग गाऊन परिधान केला होता. तर जस्टिन ब्लॅक टक्सीडोमध्ये दिसत होता. २०१८ मध्ये जस्टिनने हिलीसोबत लग्न केलं. २०१६ पासून जस्टिन हिलीला डेट करत होतो. दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर ही जोडी लग्न बंधनात अडकली.

 

23
X