26 September 2020

News Flash

अबब… दोन कोटी डॉलर्सचा दावा; ‘त्या’ महिलेविरोधात जस्टिन बिबर न्यायालयात

जस्टिनवर लैंगिक गैरवर्तनुकीचे आरोप करणारी महिला अडचणीत

प्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बिबरवर एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. सहा वर्षांपूर्वी जस्टिनने एका महिलेला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी जस्टिनने तिच्यावर लैंगिक जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप सोशल मीडियावरद्वारे एका महिलेने केला. या आरोपामुळे जस्टिन संतापला आहे. त्याने या महिलेविरोधात तब्बल दोन कोटी अमेरिकी डॉलर्सचा मानहानिचा दावा ठोकला आहे.

प्रकरण काय आहे?

९ मार्च २०१४ साली टेक्सासमधील एका हॉटेलमध्ये जस्टिनने एका महिलेला तिच्या मित्रमंडळींसोबत भेटण्यासाठी बोलावले होते. यावेळी जस्टिनने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप एका महिलेने सोशल मीडियाव्दारे केला होता. या आरोपामुळे जस्टिनवर प्रचंड टीका केली गेली. परंतु या प्रकरणावर जस्टिनने प्रतिक्रिया देताच तिने आपली पोस्ट डिलिट करुन टाकली. यामुळे जस्टिन संतापला आहे. त्याने या महिलेविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच या महिलेला कायदेशीर नोटिस बजावत तिच्याविरोधात दोन कोटी अमेरिकी डॉलर्सचा मानहानिचा दावा ठोकला आहे.

“अशा प्रकारचे आरोप माझ्यावर अनेकदा झाले आहेत. आजवर अशा मंडळींकडे मी दुर्लक्ष करत आलो आहे. मात्र यावेळी नाही. माझी पत्नी व टीमशी चर्चा करुन, मी या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.” अशा आशयाचे ट्विट त्याने केले आहे.
यानंतर जस्टिनने आणखी काही ट्विट केली आहेत. यामध्ये त्याने तो निर्दोष असल्याचे पुरावे सादर केले आहेत. तसेच ९ मार्च २०१४ साली तो ज्या हॉटेलमध्ये थांबला होता त्या हॉटेलचे बिल देखील त्याने पोस्ट केले आहे. या पुराव्यांच्या आधारावर आता तो त्या महिलेविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 11:00 am

Web Title: justin bieber files 20 million dollars defamation lawsuit over sexual misconduct claims mppg 94
Next Stories
1 अनुष्काच्या ‘बुलबुल’ सीरिजवर हिंदुस्तानी भाऊचा आरोप; म्हणाला…
2 एकेकाळी कामाच्या शोधात असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने लॉकडाउनमध्ये साइन केले तीन चित्रपट
3 …म्हणून शाहरुखने नाकारली होती ‘स्लमडॉग मिलेनियर’ची ऑफर
Just Now!
X