News Flash

VIDEO: हेडफोन्स लावूनच ‘काबील’चा हा टीझर पाहा

आपल्याकडे डोळे असूनही आपण पाहू शकत नाही, आपल्याकडे कान असूनही आपण ऐकू शकत नाही

हृतिकचा 'काबील' हा चित्रपट पुढील वर्षी २६ जानेवारीला शाहरुख खानच्या 'रईस' चित्रपटासह प्रदर्शित होईल.

तुम्हाला डोळे आहेत, पण तुम्ही खरंच किती गोष्टी पाहू शकता? तुम्हाला कान आहेत पण तुम्ही किती ऐकता? तुम्ही स्पर्श करु शकता पण तुम्ही खरंच किती अनुभवता? हेच प्रश्न अभिनेता हृतिक रोशन याने प्रेक्षकांना केले आहेत. ‘काबीलला अनुभवा’ हेच त्याला ‘काबील’च्या टीझरमधून सांगायचे आहे. आज हृतिकच्या आगामी ‘काबील’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला.

हृतिक रोशन आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘काबील’च्या टीझरचे हे योग्य वर्णन आहे. या चित्रपटाची निर्मिती राकेश रोशन यांनी केली आहे. तर याचे दिग्दर्शन दिग्दर्शक संजय गुप्ताने केलेय. चित्रपटकर्त्यांनी ‘काबील’चा पहिला टीझर आज प्रदर्शित केला असून यात हृतिकचा दमदार आवाज ऐकावयास मिळतो. ‘मोहेंजोदारो’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळल्यानंतर हृतिकला आता कमबॅक करण्यासाठी एका दमदार चित्रपटाची गरज आहे. ‘काबील’चा टीझर हा काहीसा मानवी इंद्रियांना आव्हान करणारा आहे. यात रस्त्यावरील पथदिवे धुसर दाखविण्यात आले असून हृतिकचा आवाज आपल्याला मार्गदर्शन करतो. आपल्याकडे डोळे असूनही आपण पाहू शकत नाही, आपल्याकडे कान असूनही आपण ऐकू शकत नाही, आवाज असूनही बोलू शकत नाही आणि समजत असूनही आपण समजावून सांगू शकत नाही असे हृतिकच्या आवाजात टीझरमध्ये सांगण्यात आले आहे.

हृतिकने ट्विटरवर ‘काबील’चा टीझर पोस्ट केला आहे. त्यावर त्याने लिहलेय की, ‘ट्रेलरपूर्वीची झलक. मनाला सर्वकाही कळतं. (कृपया हेडफोन्स वापरा).’  या चित्रपटात हृतिक एका अंध मिमिक्री आर्टीस्टची व्यक्तिरेखा साकारत आहे. बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन आणि बॉलीवूडमधील काही नावाजलेल्या व्यक्तिंचा तो यात आवाज काढताना दिसेल. दरम्यान, हृतिक रोशन हा आशुतोष गोवारीकरच्या ‘मोहंजोदारो’ चित्रपटात दिसला होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे, हृतिकच्या करियरसाठी काबील चित्रपट चालणे फार गरजेचे आहे.

हृतिकचा ‘काबील’ हा चित्रपट पुढील वर्षी २६ जानेवारीला शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटासह प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 6:31 pm

Web Title: kaabil teaser experience it hrithik roshan asks his fans in the appealing video
Next Stories
1 अक्षय कुमार आता जिंकणार ऑलिम्पिक पदक
2 भाजप सरकारला मी गांभीर्याने घेत नाही- अभय देओल
3 रणबीरसह लग्नाचा प्रस्ताव येताच अनुष्का म्हणाली ‘ओह नो!’
Just Now!
X