प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत याची भूमिका असलेल्या ‘काला’ या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून, आता हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

न्या. आदर्शकुमार गोयल व न्या. अशोक भूषण यांनी चित्रपट निर्माता के. एस. राजशेखरन यांची याचिका फेटाळली. या चित्रपटाची कथा, गाणी व दृश्ये हे सगळे काम माझेच होते असा दावा त्यांनी केला होता. ‘काला’ हा चित्रपट रजनीकांत यांचे जावई अभिनेते धनुष यांनी निर्मिती केलेला असून, वंडरबार फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडच्या या चित्रपटाचे दिग्दर्शक पा. रणजिथ आहेत. हा चित्रपट आधी लांबणीवर टाकण्यात आला होता. आता तो गुरुवारपासून प्रदर्शित होत आहे.

Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
Mumbai Court refuses to stay release of Maidaan
अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटावर स्थगिती आणण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

राजशेखरन यांच्या वकिलाने असा आरोप केला, की या चित्रपटाचे स्वामित्व हक्क आमच्या अशिलाकडे आहेत व निर्मात्यांनी चित्रपट बनवताना आमची परवानगी घेतली नाही. ज्या चित्रपटाची सगळे जण वाट पाहात आहेत त्याच्या प्रदर्शनास स्थगिती द्यावी अशी तुमची अपेक्षा आहे काय, अशी विचारणा करून न्यायालयाने सांगितले, की या चित्रपटाचे प्रदर्शन दोनदा लांबणीवर टाकण्यात आले आहे. वकिलांनी सांगितले, की १६ मे रोजी मद्रास उच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतची याचिका १६ जूनला सुनावणीसाठी ठेवल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयाने सांगितले, की चित्रपट प्रदर्शित होऊ द्या. तो रोखता येणार नाही. ‘कारिकलन’ या चित्रपटाची कथा आपण १९९२ मध्ये लिहिली होती. त्या कथेचे जाहीर वाचनही झाले होते, त्या वेळी रजनीकांत यांचे बंधू त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कथेचे स्वामित्व हक्क घेण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. यात रजनीकांत यांनी मुख्य भूमिका करावी असे ठरले होते. यातील कारिकलन हा चोला काळातील राजा आहे.

कथा, दृश्ये व गाणी यांचे स्वामित्व हक्क आम्ही घेतले होते व त्यांचा वापर ‘काला’ चित्रपटात विनापरवानगी करण्यात आला असे याचिकाकर्त्यांनी (के. एस. राजशेखरन) म्हटले आहे.