News Flash

महिन्याभराच्या सुटीनंतर सुपरस्टार रजनीकांत मायदेशात दाखल

विमानतळावर आपल्या लाडक्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

सुपरस्टार रजनीकांत देखील आपल्या महिन्याभराच्या अमेरिकेतील सुटीनंतर मायदेशात दाखल झाले.

भारतासह संपूर्ण जगभरात सध्या सुपरस्टार रजनीकांत यांच्या कबाली चित्रपटाचा फिव्हर पाहायला मिळत आहे. कबाली चित्रपटाने तिकीटबारीवर अक्षरश: धुमाकूळ घातला असून, चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत ४०० कोटींची बक्कळ कमाई केली आहे. येत्या काही दिवसात ‘कबाली’ चित्रपट कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढेल असा अंदाज देखील बांधण्यात आला आहे. दरम्यान, सुपरस्टार रजनीकांत देखील आपल्या महिन्याभराच्या अमेरिकेतील सुटीनंतर मायदेशात दाखल झाले. रजनीकांत आपली मुलगी ऐश्वर्यासोबत अमेरिकेत सुटीचा आनंद घेण्यासाठी गेले होते. नुकताच रजनीकांत यांनी अमेरिकेत एका चित्रपटगृहाला सरप्राईज भेट देऊन आपल्या चाहत्यांसोबत चित्रपट पाहिला.
रजनीकांत आपल्या मुलीसोबत सोमवारी सायंकाळी चेन्नईच्या विमानतळावर दाखल झाले तेव्हा नेहमीप्रमाणे रजनीकांत यांचे चाहते विमानतळावर आपल्या लाडक्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी दाटीवाटीने उपस्थित होते. सुटीचा आनंद लुटल्यानंतर ६५ वर्षीय रजनीकांत त्वरित ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच २.० या आपल्या आगामी तमीळ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहेत. दरम्यान, विमानतळावर रजनीकांत यांनी आपल्या काही चिमुकल्या चाहत्यांसोबत फोटो देखील काढले.

rajini-india-fans

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2016 10:36 pm

Web Title: kabali star rajinikanth returns to india after month long us vacation
Next Stories
1 Marathi Devdas: मराठी “देवदास”चा पहिला टीझर उद्या
2 ‘रुस्तम’च्या निमित्ताने युद्धनौकांवर चित्रीकरणाचा थरार
3 ‘कबाली’ सुपरस्टारची, ४०० कोटींची कमाई!
Just Now!
X