News Flash

पुद्दुचेरीत सार्वजनिक सुविधांचा वापर करणाऱ्यांना सरकारने दिली ‘कबाली’ चित्रपटाची तिकिटे

राज्यपाल किरण बेदींनी ट्विटरवरुन या संकल्पनेची प्रशंसा केली

‘सुपरस्टार रजनीकांत’ हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. देशाच्या फक्त दाक्षिणात्य भागातच नव्हे तर, सबंध जगातल्या चाहत्यांच्या मनात अभिनेता रजनीकांतने घर केले आहे. ‘सुपरस्टार रजनीकांत’च्या चालण्यापासून ते अगदी त्याच्या रुपयाचे नाणे फिरवण्याच्या हटके अंदाजापर्यंत सर्वच चौकटीबाहेर जाणारं. वयाच्या मर्यादा ओलांडत रजनीकांतने साकारलेल्या ‘थलाइवा’, ‘लिंगा’ या चित्रपटांतून त्याने साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या. आता हा सुपरस्टार ‘कबाली’च्या रुपाने पुन्हा एकदा चित्रपट विश्वात एक नवी भूमिका साकारताना दिसणार आहे. पीए.रंजीथ यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या ‘कबाली’ या चित्रपटात रजनीकांत एका मलेशियन डॉनची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात रजनीकांतसह राधिका आपटे, किशोर, कलैरसन, धन्शिका, विन्सटन चाओ, दिनेश हे कलाकारसुद्धा झळकणार आहेत.
रजनीकांतच्या या स्टारडमचा वापर करत पुद्दुचेरी सरकारने एक आगळीवेगळी युक्ती योजली आहे. रजनीकांतची रसिकांवर असलेला छाप पाहता, सदर ठिकाणी सार्वजनिक सेवांचा व सुविधांचा वापर करणाऱ्यांना ‘कबाली’ चित्रपटाची मोफत बक्षिसपात्र तिकिटे देणार असल्याची घोषणा पुद्दुचेरी सरकारने केली आहे. पुद्दुचेरीच्या राज्यपाल किरण बेदी यांनी ट्विटरवरुनही या आगळ्यावेगळ्या संकल्पनेची प्रशंसा केली आहे. याशिवाय किरण बेदींनी अभिनेता रजनीकांतला पुद्दुचेरी सरकारच्या कल्याणकारी योजनांचे ‘ब्रॅंड अॅम्बेसेडर’ होण्यासंबंधीचीही विचारणा केली आहे. ‘कबाली’च्या निमित्ताने प्रशासन आणि राजकारणात झालेला हा काहीसा ‘फिल्मी’ आणि परिणामकारक उपक्रम जनतेला सार्वजनिक सेवांचा व सुविधांचा वापर करणासाठी कितपत प्रवृत्त करेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 11:17 am

Web Title: kabali tickets as gift
Next Stories
1 अभिनेता कमल हसन रुग्णालयात दाखल
2 टायगर साकारणार ‘मुन्ना मायकल’
3 वरुणच्या सांगण्यावरुन ठेवले ‘जानेमन आ…’ मधले चुंबनदृश्य
Just Now!
X