News Flash

परवीन बाबीमुळे पत्नीला दिला होता नाव बदलण्याचा सल्ला, कबीर बेदींनी केला खुलासा

त्यांनी एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.

बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणारे अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणजे कबीर बेदी. सध्या कबीर बेदी यांचे ‘स्टोरीज आय मस्ट टेल’ हे आत्मचरित्र प्रकाशित होण्यापूर्वीच चर्चेत आहेत. या आत्मचरित्रात त्यांनी त्यांचे लग्न, लव अफेअर आणि रिलेशनशीप विषयी अनेक खुलासे केले आहेत. कबीर यांनी ७० वर्षांचे असताना पाच वर्षांपूर्वी २०१६मध्ये लग्न केल्याचा खुलासा केला आहे. दरम्यान एका मुलाखतीमध्ये कबीर बेदींनी पत्नीला, परवीन दुसांझला नाव बदलण्याचा सल्ला दिला असल्याचा खुलासा केला आहे.

‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कबीर बेदी यांनी त्यांची पत्नी परवीन दुसांझशी लग्न केल्यानंतर नाव बदलण्याचा सल्ला होता. जेणे करुन लोकांचा गोंधळ होणार नाही असे म्हटले. पण त्यांच्या पत्नीने सरळ त्यांना नकार दिला होता.

‘मी म्हटले होते माझ्या आयुष्यात यापूर्वी ही एक परवीन होती. त्यामुळे जर तुला वाईट वाटणार नसेल तर तू तुझे नाव बदल जेणे करुन लोकांचा गोंधळ होणार नाही. त्यावर उत्तर देत परवीन मला म्हणाली तुझी हिंमत कशी झाली माझे नाव बदल हे देखील विचारण्याची?’ असे कबीर म्हणाले.

आणखी वाचा : वहीदा रहमान यांनी वयालाही लाजवलं, ८३ व्या वर्षी केलं water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

पुढे कबीर म्हणाले, ‘परवीन जेव्हा लंडनहून भारतात आली तेव्हा तिला कळाले की परवीन बाबी माझ्या आयुष्यात किती महत्त्वाची व्यक्ती होती. त्यानंतर मी पत्नीला वी म्हणून आवज देऊ लागलो. परवीन दुसांजसोबत मी बराच काळ राहिलो. आम्ही १५ वर्षे एकत्र होतो आणि पाच वर्षांपूर्वी आम्ही लग्न केले.’

परवीन बाबी आणि कबीर बेदी यांच्या अफेअरच्या एकेकाळी चर्चा रंगल्या होत्या. पण २००५मध्ये परवीन यांचे निधन झाले. कबीर बेदी यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये परवीन बाबी आणि त्यांची पहिली पत्नी प्रितम यांच्याविषयी खुलासा केला आहे. लवकरच त्यांचे ‘स्टोरी आय मस्ट टेल’ हे प्रकाशित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 1:31 pm

Web Title: kabir bedi reveals that he asked wife parveen dusanj to change her name avb 95
Next Stories
1 ‘टकाटक पार्ट २’; नवीन वर्षाच्या सुरुवातीला चित्रीकरणाला टकाटक सुरुवात
2 “मागच्या वर्षी झोपलेलात का तुम्ही?”; लॉकडाउनच्या ‘त्या’ विधानामुळे महेश कोठारे ट्रोल!
3 ‘तारक मेहता..’ मध्ये दिशा वकानीची पुन्हा एण्ट्री, असित कुमार मोदींची सकारात्मक प्रतिक्रिया
Just Now!
X