News Flash

‘आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला, पण…’, मुलाच्या आत्महत्येवर कबीर बेदींचा खुलासा

त्यांनी एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.

बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणारे अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणजे कबीर बेदी. कबीर बेदी यांचे ‘Stories I Must Tell: The Emotional Life of an Actor’ हे आत्मचरित्र प्रकाशित होण्यापूर्वीत चर्चेत आहे. या आत्मचरित्रात त्यांनी परवीन बाबीसोबतच्या अफेअरपासून ते मुलगा सिद्धार्थच्या आत्महत्येपर्यंत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

नुकताच कबीर यांनी ‘बॉलिवूड हंगामा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी मुलगा सिद्धार्थच्या आत्महत्येवर वक्तव्य केले आहे. ‘सिद्धार्थ अतिशय हुशार मुलगा होता. पण एक दिवस अचानक त्याचे गोष्टींचा विचार करणे बंद झाले. त्याला आम्ही अनेकदा सजवण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी आम्ही Montreal गेला होता. तेथे त्याला रस्त्यावर रागात पाहिले. तेव्हा त्याला सांभाळायला आठ पोलीस पुढे धावून आले. तेथील डॉक्टरांनी त्याला सीजोफ्रेनिया नावाचा आजार झाल्याचे सांगितले’ असे कबीर म्हणाले.

आणखी वाचा : कोणी आजारपणामुळे गेलं तर काहींनी केली आत्महत्या, ‘या’ सेलिब्रेटींनी गमावलंय आपल्या मुलांना

 

View this post on Instagram

 

A post shared by Kabir Bedi (@ikabirbedi)

आणखी वाचा: ‘कोणालाही न सांगता तिने…’, साजिदच्या पत्नीनेच वाजिदला केली होती किडनी दान

पुढे ते म्हणाले, ‘सिद्धार्थला बरं करण्यासाठी कुटुंबीय प्रयत्न करत होते. आम्ही त्याला वाचवण्यासाठी अफाट प्रयत्न केले होते. पण तो आम्हाला सोडून निघून गेला.’ सिद्धार्थने वयाच्या २५व्या वर्षी आत्महत्या केली. आजही कबीर हे मुलाच्या आठवणीत भावूक होतात. त्यांनी त्यांच्या ‘स्टोरीज आय मस्ट टेल’ या पुस्तकात खासगी आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत अनेक गोष्टींबाबत खुलासे केले आहेत.

यापूर्वी कबीर यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये पत्नी परवीन दुसांझशी लग्न केल्यानंतर तिला नाव बदलण्याचा सल्ला दिल्याचा सांगितले होते. ‘मी म्हटले होते माझ्या आयुष्यात यापूर्वी ही एक परवीन होती. त्यामुळे जर तुला वाईट वाटणार नसेल तर तू तुझे नाव बदल जेणे करुन लोकांचा गोंधळ होणार नाही. त्यावर उत्तर देत परवीन मला म्हणाली तुझी हिंमत कशी झाली माझे नाव बदल हे देखील विचारण्याची?’ असे कबीर म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 3:12 pm

Web Title: kabir bedi talk on 25 years old son siddharth suicide avb 95
Next Stories
1 ‘आर्मी ऑफ द डेड’मधून हुमा कुरेशीची हॉलिवूडमध्ये एण्ट्री; दमदार ट्रेलर रिलीज
2 ‘माझ्याशी पंगा घेऊ नका’, रुबिनाचा फोन नंबर लीक होताच पती संतापला
3 महाराष्ट्रात संचारबंदी पण तरीही पाहायला मिळणार ‘या’ मालिकांचे नवे भाग…..जाणून घ्या कारण!
Just Now!
X