News Flash

कबीरने शेअर केला सलमानच्या ‘ट्युबलाइट’ चित्रपटाच्या लोकेशनचा फोटो

सलमान खानची आज काळवीट शिकार प्रकरणातून निर्दोष सुटका करण्यात आली.

सलमान खानची काळवीट शिकार प्रकरणी सुटका होत नाहीच तोवर दिग्दर्शक कबीर खानने आपल्या आगामी चित्रपटाच्या लोकेशनचा फोटो शेअर केला आहे. दिग्दर्शक कबीर खान आणि अभिनेता सलमान खान ही जोडी तिस-यांदा एकत्र येत आहे. ट्युबलाइट हा सलमानचा आगामी चित्रपट आहे.
कबीरने दिलेल्या शब्दानुसार जुलैच्या शेवटी लडाख येथे ट्युबलाइटच्या चित्रीकरणास सुरुवात होत आहे. कबीरने लोकेशनचा फोटो ट्विट करत म्हटले की, २८ तारखेपासून चित्रीकरणास सुरवात होईल. #Tubelight  @BeingSalmanKhan. तुम्ही सुद्धा उत्सुक आहात ना?. हा चित्रपट कबीरचा आतापर्यंतचा सर्वाधिक महत्त्वाकांक्षी चित्रपट असल्याचे म्हटले जातेय. सलमान खान पहिल्यांदाच लडाख येथे शूटींग करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटातील सर्व कलाकार आणि टीम जवळपास महिनाभर लडाख येथे शूटींग करणार आहेत. बजरंगी भाईजानच्या वेळी सलमानने पहिल्यांदाच काश्मिरमध्ये शूटींग केले होते. त्यावेळी काश्मिरच्या सौंदर्याने तो भारावून गेला होता. आता बहुदा तो त्याच्या चित्रपटांसोबतच लोकेशन्सवरही बराच विचार करत असल्याचे दिसते.
ट्युबलाइट हा चित्रपट चीन आणि भारतात झालेल्या युद्धावर आधारित आहे. तर याची कथा एक सामान्य माणूस आणि लहान चीनी मुलगी यांच्याभोवती फिरेल. या चित्रपटात सलमानचा लहान भाऊ आणि अभिनेता सोहेल खानदेखील झळकणार आहे. हे दोघेही यात भावांच्या भूमिकेत दिसतील. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेत्रीच घेण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी चित्रपटात सलमानच्या प्रेयसीची भूमिका दीपिका पदुकोण करणार असल्याची चर्चा जोरात चालू होती. पण, कबीरने सर्व चर्चांना खोटे ठरवत चित्रपटात कोणीच अभिनेत्री नसल्याचा खुलासा केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2016 3:05 pm

Web Title: kabir khan just shared the location of salman khans tubelight and you would wanna go there right away
Next Stories
1 सिनेमा विशेष : रजनीकांतचे हिंदीचे प्रगती पुस्तक
2 ‘दिल्ली मला लाहोरची आठवण करून देते’
3 काळवीटाला सलमानने नाही, तर कोणी मारले?
Just Now!
X