07 August 2020

News Flash

प्रदर्शनाच्या पाच वर्षानंतरही जपानच्या चित्रपटगृहांमध्ये दाखवला जातोय सलमानचा ‘हा’ चित्रपट

दिग्दर्शक कबीर खानने दिली माहिती.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि दिग्दर्शक कबीर खान ही जोडी अतिशय लोकप्रिय आहे. त्यांनी टायगर जिंदा है आणि बजरंगी भाईजान अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहेत. दोघांचे चित्रपट विशेष गाजले देखील. नुकताच कबीर खानने सलमानचा चित्रपट प्रदर्शित होऊन पाच वर्षे उलटली आहेत. तसेच जपानच्या काही चित्रपटगृहांमध्ये आजही तो दाखवला जात आहे असे म्हटले आहे.

सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाला नुकतीच पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने कबीर खानने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये त्याने ‘पाच वर्षानंतरही जपानमधील काही चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट दाखवला जात आहे. #5YearsOfBajrangiBhaijaan’ असे म्हटले होते.

 

View this post on Instagram

 

5 years later it’s still running in some theatres in Japan #5YearsOfBajrangiBhaijaan

A post shared by Kabir Khan (@kabirkhankk) on

तसेच त्याने आणखी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये ‘एक चित्रपट जो नेहमी आमच्यासाठी खास होता. कारण तुम्ही सर्वांनी बजरंगी भाईजानला भरभरुन प्रेम दिले. तुमच्या सर्वांचे मनापासून आभार’ असे म्हटले होते.

‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात सलमानसोबत हर्षाली मल्होत्रा, करीना कपूर, नावजुद्दीन सिद्दीकी हे कालाकार मुख्य भूमिकेत दिसले होते. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले होते. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आता हा चित्रपट प्रदर्शित होऊन पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 10:02 am

Web Title: kabir khan post on salman khan bajrangi bhaijaan turns 5 avb 95
Next Stories
1 ‘फक्त रणबीर-आलियाच बेस्ट कलाकार नाहीत’, लेखकाचे आर. बाल्कींना उत्तर
2 अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नानावटी रुग्णालयात दाखल
3 सोनाक्षीची ढासू एण्ट्री; ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’चं नवं पोस्टर रिलीज
Just Now!
X