News Flash

‘कबीर सिंग’ ठरतोय सुपरहिट! तिसऱ्याच दिवशी गाठला ५० कोटींचा पल्ला

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे

'कबीर सिंग'

अभिनेता शाहिद कपूरचा ‘कबीर सिंह’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २०.२१ कोटी रुपयांची कमाई केली असून शाहिदच्या करिअरमधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंती उतरल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई सुरुच आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘कबीर सिंग’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या तिन दिवसात तब्बल ७०.८३ कोटी रुपयांची कमाई केली असल्याचे ट्विटरद्वारे सांगितले आहे. तसेच शाहिद कपूरच्या ‘पद्मावत’ चित्रपटानंतर प्रदर्शनाच्या तिन दिवसात सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट असल्याचे देखील सांगितले आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी २०.२१ कोटी रुपयांचा गल्ला जमावला होता तर दुसऱ्या दिवशी २२.७१ कोटी रुपयांची कमाई केली. दोन दिवसांमध्ये चित्रपटाने एकूण ४२.९२ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे हा चित्रपट लवकरच ७० कोटी रुपयांचा टप्पा गाठेल अशी शक्यता तरण आदर्श यांनी व्यक्त केली होती आणि आता त्यांचा अनुमान योग्य ठरल्याचे पाहायला मिळत आहे.

‘कबीर सिंग’ हा चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट दक्षिणीकडे तुफान गाजला होता. ‘अर्जुन रेड्डी’ या दाक्षिणात्य चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले होते. या रिमेकचे दिग्दर्शनही संदीप वांगा केले आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2019 2:38 pm

Web Title: kabir singh box office collection day 3 avb 95
Next Stories
1 भारत नव्हे, तर ‘या’ चित्रपटातील भूमिका सलमानसाठी आव्हानात्मक
2 मृण्मयीच्या मिस यू मिस्टरसोबत ‘या’ दिवशी होणार चाहत्यांची भेट
3 हॉकीनंतर फूटबॉल खेळण्यासाठी सागरिका सज्ज!
Just Now!
X