News Flash

Photo : …अन शाहिद-कियाराने केलं लिपलॉक

हे पोस्टर बोल्ड असल्याचे दिसत आहे

'कबीर सिंग'

अभिनेता शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ हा बहुचर्चीत आणि बहुप्रतिक्षीत चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट सुप्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक आहे. अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट दक्षिणेकडे तुफान गाजला होता. ‘कबीर सिंग’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. ट्रेलर पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली होती. आता चित्रपटाचे आणखी एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये शाहिद आणि कियारा रोमॅंटिक अंदाजात दिसत आहेत. हे पोस्टरपाहून चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

आता पर्यंत प्रदर्शित झालेले पोस्टर आणि ट्रेलरमध्ये शाहिद कपूर अत्यंत रागिट आणि विक्षिप्त भूमिकेत पाहायला मिळाला. परंतु आता प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये शाहिदचा पूर्णपणे वेगळा लूक पाहायला मिळाला आहे. या पोस्टरमध्ये शाहिद कपूर आणि कियारा लिपलॉक करताना दिसत आहेत. आता पर्यंत अनेक चित्रपटांचे पोस्टर प्रदर्शित झाले आहेत. परंतु हे पोस्टर बोल्ड असल्याचे दिसत आहे. त्यामुळे चित्रपटाबाबतच्या चर्चांना आणखी जोर आला आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटद्वारे ‘कबीर सिंह’चे पोस्टर प्रदर्शित झाल्याचे सांगितले आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. या चित्रपटात शाहिद वैद्यकिय शाखेतील विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच कॉलेजमध्ये शिकत असताना शाहिद कियारा उर्फ प्रीतीच्या प्रेमात पडतो. परंतु प्रेयसी सोडून गेल्यानंतर व्यसनाधीन झालेल्या अँग्री यंग मॅन, कबीर सिंगची भूमिका लक्षवेधी ठरणार आहे. त्यामुळे हिंदी रिमेकची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे.

‘अर्जुन रेड्डी’ या दाक्षिणात्य चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप वांगा यांनी केले होते. आता या रिमेकचे दिग्दर्शनही संदीप वांगा करत आहेत. हा चित्रपट २१ जून २०१९ ला प्रदर्शित होत आहे. चित्रपटात शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 5:31 pm

Web Title: kabir singh new poster is out
Next Stories
1 Video : मुलींना डान्सर करण्याचं स्वप्न पाहू नका, सपना चौधरीचा सल्ला
2 राजेश-रेशमनंतर ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील हे ‘लव्हबर्ड’ चर्चेत
3 ‘ट्रोलिंगला घाबरून लग्न झाल्याचा आनंद साजरा करायचा नाही का?’ प्रियांकाचा सवाल
Just Now!
X