News Flash

कॉलेजमधील विद्यार्थ्याची भूमिका साकारताना घाबरलो होतो – शाहिद कपूर

२००३नंतर आता 'कबीर सिंग'मध्ये शाहिद कॉलेजमधील विद्यार्थांची भूमिका साकारत आहे.

'कबीर सिंग'

बॉलिवूडमधील अभिनेते भूमिकेला न्याय देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असतात. भूमिकेची गरज ओळखून ती भूमिका योग्यप्रकारे निभावण्यासाठी ते सखोल अभ्यास करतात. अभिनेता शाहिद कपूरदेखील अशाच अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहिद व कियाराचा ‘कबीर सिंग’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून सध्या हे दोघंही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. कियारा व शाहिदची व स्क्रीन केमिस्ट्री बघायला चाहते उत्सुक आहेत.

या चित्रपटात शाहिद वैद्यकीय कॉलेजमधील एका विद्यार्थ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. २००३मध्ये जेव्हा शाहिदने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते तेव्हा ‘इश्क विश्क’ चित्रपटात त्याने कॉलेजमधील विद्यार्थ्याची भूमिका साकारली होती. इतक्या वर्षांनी तो पुन्हा एकदा कॉलेजमधील विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. एका मुलाखतीत शाहिदला या भूमिकेविषयी प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, “मी खूप घाबरलो होतो. मला अशी भीती होती की, माझी मुलं मोठी झाल्यानंतर जेव्हा हे काम बघतील तेव्हा असं म्हणतील की, “हे करायची काय गरज होती बाबा ? विसरलात का..तुम्ही ३८ वर्षांचे आहात.”

या चित्रपटात शाहिद व्यसानाधीन भूमिकेत असल्यामुळे त्याला चित्रीकरणादरम्यान मोठ्या प्रमाणात सिगारेट आणि विडीचे सेवन करावे लागेल आहे. “सिगारेटचा वास जाण्यासाठी मी जवळपास दोन तास आंघोळ करायचो.” असंही शाहिदने सांगितलं. रुपेरी पडद्यावर डॉक्टर साकारण्यासाठी मुंबईतील मोठ्या हॉस्पिटल्समधील सगळ्या डॉक्टरांना तो प्रत्यक्ष जाऊन भेटला.

‘कबीर सिंग’ हा चित्रपट सुप्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा रिमेक आहे. रिमेकचे दिग्दर्शनही संदीप वांगा करत असून हा चित्रपट २१ जून २०१९ ला प्रदर्शित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2019 11:02 am

Web Title: kabir singh shahid kapoor college student djj 97
Next Stories
1 आमिरच्या ‘लाल सिंग चढ्ढा’मध्ये झळकणार करीना?
2 अक्षय विरुद्ध प्रभास: १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार ‘हे’ दोन मोठे चित्रपट
3 ‘मोगरा फुलला’मध्ये १४ वर्षांनंतर स्वप्नील जोशी – नीना कुलकर्णी एकत्र
Just Now!
X