17 January 2021

News Flash

‘कबीर सिंग’ ठरणार २०१९ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ?

याबाबतीत शाहिदने सलमान खान व अक्षय कुमार या दिग्गजांनाही मागे टाकलं आहे.

कबीर सिंग

तेलुगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक ‘कबीर सिंग’ची बॉक्स ऑफीसवर यशस्वी घोडदौड सुरूच आहे. भारताबाहेरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. नुकतीच या चित्रपटाने १९८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

तेलुगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक ‘कबीर सिंग’ हा चित्रपट २१ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे, हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंती उतरला. केवळ चार दिवसांतच या चित्रपटाने शंभर कोटी रुपयांची कमाई केली. आयुषमान खुरानाच्या ‘आर्टिकल १५’ या चित्रपटाला सुद्धा कबीर सिंग चांगलीच टक्कर देत आहे. अर्जुन रेड्डीने बॉक्स ऑफीसवर जितकी कमाई केली होती, त्याहून अधिक कमाई ‘कबीर सिंग’ने अवघ्या तीन दिवसांत केली होती.

‘बॉक्स ऑफिस ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, कमाईच्या बाबतीत ‘कबीर सिंग’ सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाला मागे टाकणार आहे. ‘कबीर सिंग’ने केवळ १२ दिवसात १९५.८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर ‘भारत’ने २३ दिवसात १९६.७ कोटी रुपयांची कमाई केली होती. २०१९ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट असेल असे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत विकी कौशलच्या ‘उरी’ चित्रपटाने सर्वाधिक म्हणजेच,२४५.३६ कोटी रुपयांची कमाई केली होती. कबीर सिंग लवकरच तेवढी कमाई करेल असे सांगण्यात येत आहे.

प्रेक्षकांनी जरी या चित्रपटाला डोक्यावर उचलून घेतलं असलं तरी काहींनी यामधील शाहिदच्या भूमिकेवर टीका केली आहे. सतत कोणाच्या तरी अंगावर ओरडणे, एका ठरावीक चौकटीतून समोरच्याकडे पाहणारी, त्याच्याकडून तशीच अपेक्षा ठेवणारी व्यक्तिरेखा प्रत्यक्षात नाहीच असे म्हणता येत नाही. मात्र त्याच्या वागण्याचे समर्थनही करता येत नाही, असं अनेकांचं मत आहे. दुसरीकडे काहींनी शाहिदच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. त्याच्या करिअरमधील ही सर्वोत्तम भूमिका असल्याचं काहींचं म्हणणं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2019 11:24 am

Web Title: kabir singh shahid kapoor kiara advani box office collection djj 97
Next Stories
1 अक्षय कुमारचा व्हिडीओ शेअर करताना रितेशचा मजेदार अंदाज पाहिलात का?
2 सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेतील विकी कौशलच्या लष्करी पोषाखात आहेत चुका
3 कबीर सिंग पाहण्यासाठी अल्पवयीन मुलाने आधारकार्डवरील जन्मतारीख बदलली
Just Now!
X