20 January 2021

News Flash

बॉक्स ऑफिसवर ‘कबीर सिंग’ची सेंच्युरी!

चित्रपट लीक होऊनही प्रेक्षकांनी या चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला आहे

कबीर सिंग

अभिनेता शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ हा चित्रपट २१ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या चित्रपटामुळे शाहिदच्या करिअरला कलाटणी मिळाली आहे. विशेष म्हणजे केवळ पाच दिवसामध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी २०.२१ कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर या चित्रपटाच्या आकडेवारीमध्ये कमालीची वाढ झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे वीकडेजमध्ये या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे केवळ पाच दिवसांमध्ये या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

‘कबीर सिंग’ने पहिल्या दिवशी २०. २१ कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २२.७१ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी २७.९१ कोटी रुपये, तर सोमवारी आणि मंगळवारी या चित्रपटाने अनुक्रमे १७.५४ आणि १६.५३ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपटा एकूणच १०४.९० कोटी रुपयांची कमाई करत ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे.

दरम्यान, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही काळातच तो सोशल मीडियावर लीक झाला होता. पायरेटेड वेबसाईट तमिळ रॉकर्सवर हा चित्रपट लीक झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र लीक होऊनही या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 12:38 pm

Web Title: kabir singh unstoppable at the box office crossed 100 crore mark in 5 days ssj 93
Next Stories
1 Video : ‘ये बस’, दीपिकाने छायाचित्रकाराला दिले मजेशीर आमंत्रण
2 वडिलांसह सलमानची रंगली मैफिल, पाहा व्हिडीओ
3 अटक प्रकरण पथ्यावर, बिचुकलेंनी महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे
Just Now!
X