31 May 2020

News Flash

छोट्या पडद्यावरील ही लोकप्रिय मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

अल्पावधीतच मिळालेली लोकप्रियता

कहाँ हम कहाँ तुम

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘कहाँ हम कहाँ तुम’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत करण ग्रोवर आणि दीपिका कक्कर इब्राहिम मुख्य भूमिका साकारत आहेत. डॉक्टर आणि अभिनेत्री यांच्यातील प्रेमकथेवर आधारित ही मालिका आहे. मार्च महिन्यात या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होणार आहे.

मालिकेत रोहित सिप्पीची भूमिका साकारणाऱ्या करण ग्रोवरने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत भावूक होत म्हटलं, “मला शब्दच सुचत नाहीयेत. १४ मार्च रोजी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. टीआरपीच्या यादीत आम्ही पुढे असूनही मालिका बंद करण्याचा निर्णय का घेण्यात आला याचं उत्तर अजूनही आम्हाला मिळालं नाही. हे सर्व अनपेक्षित आहे.”

आणखी वाचा : ..म्हणून बिग बींनी आठवडाभर धुतलं नव्हतं तोंड 

१७ जून २०१९ रोजी या मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित झाला होता. रोहित सिप्पी आणि सोनाक्षी रस्तोगी या दोन भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. नेहमीच्या सासू-सूनेच्या कथेपेक्षा एक वेगळी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अल्पावधीतच मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी जोडी प्रसिद्ध झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2020 2:25 pm

Web Title: kahaan hum kahaan tum to go off air soon ssv 92
Next Stories
1 Video : गुंतागुंतीच्या नात्यांचा ‘मन फकिरा’
2 नेहा कक्करच्या बॉयफ्रेंडचा धक्कादायक खुलासा
3 गोरिलासोबत अभिनेत्रीचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल..
Just Now!
X