News Flash

‘कैसी ये यारिया’ सीझन ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

२०१४ मध्ये आलेला हा शो तरूणांमध्ये चांगलाच गाजला होता

२०१४ मध्ये तरुणाईमध्ये प्रचंड गाजलेला कैसी ये यारिया हा टिव्ही शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निती टेलर व पार्थ समाथान हे पुन्हा एकदा रोमान्स करताना दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी या दोघांनीही एका व्हिडिओद्वारे हा शो पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. ‘एमटीव्ही’वर दाखवल्या जाणाऱ्या या शोचा तिसरा सीझन मात्र डिजिटल प्लॅटफॉर्मवर येणार आहे. या व्हिडिओत सीझन ३ चे शूटिंग सुरू झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.

२०१४ मध्ये आलेला हा शो तरूणांमध्ये चांगलाच गाजला होता. शहरातील एका नावाजलेल्या कॉलेजमध्ये ५ मित्र मिळून एक म्युझिकल बँड सुरू करतात. या मालिकेतील माणिक आणि नंदिनीची केमिस्ट्री चांगलीच चर्चेत होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये होणारे मतभेद, प्रेमभंग व अनेक हलक्य फुलक्या गोष्टींनी रंगलेल्या या शोचा दुसरा सीझनही पहिल्याप्रमाणेच गाजला होता. बीबीसी वर्ल्डवाईड इंडियाची निर्मिती असलेला या शोचे शूटिंग सध्या सुरू असून लवकरच तो वूट या वायकॉम१८ च्या अपवर दाखवला जाणार आहे.

https://www.voot.com/clip/voot-exclusive-shout-out-to-a-new-season-of-love/567623

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 7:05 pm

Web Title: kaisi yeh yaariaan to be back with a brand new season parth samthaan shares the good news
Next Stories
1 ‘मणिकर्णिका’मधील कंगनाचा दुसरा लूक व्हायरल
2 Sacred Games : वेब सीरिजच्या विश्वात सैफचं पदार्पण, फर्स्ट लूक प्रदर्शित
3 जातीवाचक वक्तव्य केल्याने सलमान- कतरिना अडचणीत
Just Now!
X