News Flash

होणाऱ्या पतीसोबत काजल अगरवालचे फोटो व्हायरल

येत्या ३० ऑक्टोबर रोजी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये तिचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, kajalaggarwal.fanpage

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री काजल अगरवाल आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. व्यावसायिक गौतम किचलूशी ती लग्नगाठ बांधणार असून त्याविषयीची घोषणा तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर केली. येत्या ३० ऑक्टोबर रोजी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये तिचा विवाहसोहळा पार पडणार आहे. ऑगस्ट महिन्यात काजल आणि गौतमचा साखरपुडा पार पडला. या बहुचर्चित जोडीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गौतम आणि काजल हे शालेय जीवनापासून एकमेकांना ओळखत असल्याचं म्हटलं जातं.

गौतमने पहिल्यांदाच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुड्याचा फोटो पोस्ट केला होता. या दोघांचे इतरही काही फोटो काजलच्या फॅनपेज अकाऊंटवर पोस्ट करण्यात आले आहेत. विविध कार्यक्रमांमध्ये या दोघांनी एकत्र हजेरी लावल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळतंय.

आणखी वाचा : तापसीने पहिल्यांदाच पोस्ट केला बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडीओ

काजलने मॉडेलिंगपासून तिच्या करिअरची सुरुवात केली. तिने तेलुगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. ‘मगधीरा’ हा तिच्या करिअरमधील उल्लेखनीय चित्रपट आहे. या चित्रपटाने दाक्षिणात्य बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली होती आणि काजलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारदेखील मिळाला होता. २०११ मध्ये तिने ‘सिंघम’ या चित्रपटात अजय देवगणसोबत काम केलं. त्यानंतर ती ‘स्पेशल २६’ या चित्रपटातही झळकली. यामध्ये तिने अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 2:18 pm

Web Title: kajal aggarwal and gautam kitchlu unseen pictures of the adorable couple ssv 92
Next Stories
1 “जर मला काही झाले तर सलमान, करण जबाबदार असतील,” अभिनेत्याचे खळबळजनक ट्विट
2 KBC : कार्यक्रम सुरू असतानाच बिग बींचा कम्प्युटर पडला बंद आणि..
3 “इस्लाम मेक अप करण्याची परवानगी देतं का?” धर्मासाठी बॉलिवूड सोडणारी सना होतेय ट्रोल
Just Now!
X