‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालच्या आगामी दाक्षिणात्य चित्रपटाचा टीझर लाँच कार्यक्रम नुकताच पार पडला. ‘कवचम’ या चित्रपटाच्या टीझर लाँच कार्यक्रमाला काजलसोबतच दिग्दर्शक श्रीनिवास मामिल्ला, अभिनेता बेल्लमकोंडा श्रीनिवास आणि मेहरीन पीरझादा उपस्थित होते. मात्र एका वेगळ्याच कारणासाठी हा कार्यक्रम चर्चेत आला. ते कारण म्हणजे स्टेजवर सिनेमॅटोग्राफरने काजलला किस करण्याचा केलेला प्रयत्न.

या कार्यक्रमात काजल बोलण्यासाठी उभी राहिली. ती दिग्दर्शक आणि इतर सहकलाकारांचे आभार मानताना सिनेमॅटोग्राफर छोटा नायडू यांनी तिला किस करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काजल क्षणभरासाठी दचकली होती. ‘तुम्ही तर चान्स मारलात,’ असं म्हणत तिने प्रकरण गमतीने घेतलं.  या घटनेनंतर नायडू काजलला म्हणाले, ‘आधी तू (काजल) मेहरीनला किस केलंस. मी तुला किस करू शकत नाही असं मला थमन म्हणाला. मी का नाही करू शकत? म्हणून मी तुला किस केलं.’ त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर काजलनेही हसण्यावारी घेत म्हटलं, ‘चला ठीक आहे. कारण छोटा हे माझ्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणेच आहेत.’

https://www.instagram.com/p/BqFfjBhAgpK/

नायडू यांनी काजलला जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न केला का असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. तर सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काजलसोबत #MeToo ची घडना घडल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.