News Flash

काजलच्या घरी लगीनघाई! बहिणीने शेअर केला खास फोटो

काजलसाठी बहिणीची खास पोस्ट

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री काजल अगरवाल लवकरच विवाहबंधनात बांधली जाणार आहे. व्यावसायिक गौतम किचलूशी ती लग्नगाठ बांधणार असून काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावर ही माहिती दिली. येत्या ३० ऑक्टोबर रोजी काजल आणि गौतम लग्नाची गाठ बांधणार असून त्यांच्या घरी लग्नाच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे. यामध्येच काजलच्या बहिणी एक खास फोटो शेअर केला आहे.

काजलच्या बहिणीने म्हणजेच निशाने काजलसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये दोघी बहिणींची उत्तम बॉण्डिंग दिसून येत आहे. या फोटोला निशाने “That wedding glow is just a workout away. ‘मेहेंदी है रचनेवाली. #KajGautKitched’, असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, २९ ऑक्टोबर रोजी काजलचा मेहंदी आणि हळदी सोहळा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. काजलने मॉडेलिंगपासून तिच्या करिअरची सुरुवात केली. तिने तेलुगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. ‘मगधीरा’ हा तिच्या करिअरमधील उल्लेखनीय चित्रपट आहे. २०११ मध्ये तिने ‘सिंघम’ या चित्रपटात अजय देवगणसोबत काम केलं. त्यानंतर ती ‘स्पेशल २६’ या चित्रपटातही झळकली. यामध्ये तिने अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 3:45 pm

Web Title: kajal aggarwal preps for mehendi ceremony dcp 98 ssj 93
Next Stories
1 अमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली…
2 प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांच्या मनावर ‘राधेश्याम’ची भुरळ; ४ दिवसात रचला ‘हा’ इतिहास
3 …तेव्हा समजलं बिग बी अन् माझ्यातलं अंतर; शाहरुखने सांगितला ‘मोहब्बतें’च्या सेटवरचा अनुभव
Just Now!
X