दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री काजल अगरवाल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून काजलने होणाऱ्या पतीच्या नावाची मेहंदी लावली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने मेहंदीचा फोटो पोस्ट केला आहे. ३० ऑक्टोबर रोजी काजल गौतम किचलूशी लग्न करणार आहे.

गौतम हा व्यावसायिक असून इंटेरिअर डिझायनिंगचा त्याचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी काजलने लग्नाची घोषणा करताना सोशल मीडियावर लिहिलं, ‘मी हो म्हणाले. मला हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की मी ३० ऑक्टोबर २०२० रोजी गौतम किचलूशी लग्नगाठ बांधत आहे. मुंबईत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडणार आहे. आयुष्याचा हा नवीन प्रवास एकत्र सुरू करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तुमचं प्रेम आणि तुमच्या आशीर्वादासाठी खूप धन्यवाद.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

आणखी वाचा : कॉलेजपासूनची मैत्री आता नात्यात बदलणार; जाणून घ्या अभिज्ञा भावेच्या होणाऱ्या पतीबद्दल

काजलने मॉडेलिंगपासून तिच्या करिअरची सुरुवात केली. तिने तेलुगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. ‘मगधीरा’ हा तिच्या करिअरमधील उल्लेखनीय चित्रपट आहे. या चित्रपटाने दाक्षिणात्य बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली होती आणि काजलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारदेखील मिळाला होता. २०११ मध्ये तिने ‘सिंघम’ या चित्रपटात अजय देवगणसोबत काम केलं. त्यानंतर ती ‘स्पेशल २६’ या चित्रपटातही झळकली. यामध्ये तिने अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर केला होता.