28 September 2020

News Flash

काजल शर्मा व फैजल खानची ‘प्रेमकहाणी’

काजल शर्मा व ‘महाराणा प्रताप’ फेम फैजल खानच्या अनोख्या प्रेमकहाणीने स्नेहसंमेलनात प्रेमाचे अनोखे रंग भरले

मराठी चित्रपटात अनेक उत्तम विषय अलीकडे चांगल्या प्रकारे हाताळलेले दिसतात. असाच एक वेगळा विषय असलेल्या सतीश रणदिवे दिग्दर्शित ‘प्रेमकहानी-एक लपलेली गोष्ट’ या मराठी सिनेमाचे दमदार प्रमोशन नुकतंच मुलुंडच्या वझे केळकर महाविद्यालयात दिमाखात झालं.
अभिनेत्री काजल शर्मा व ‘महाराणा प्रताप’ फेम फैजल खान यांच्या अनोख्या प्रेमकहाणीने वझे केळकर महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात प्रेमाचे अनोखे रंग भरले. या दोघांच्या लाजवाब परफॉर्मन्सला उपस्थितीत विद्यार्थ्यांनी मनमुराद दाद दिली.
‘प्रेमकहानी-एक लपलेली गोष्ट’ या चित्रपटात, एक अनवट वळण येऊन आयुष्यच बदलवून टाकणा-या गोष्टी कशा घडत जातात याचा गुंगवून टाकणारा प्रवास पाहता येणार आहे. महाराष्ट्र व राजस्थान अशा दोन संस्कृतीचे दर्शन ‘प्रेमकहानी’ या चित्रपटातून घडणार असून लालचंद शर्मा निर्मित ‘प्रेमकहानी’ या चित्रपटातून नवोदित अभिनेत्री काजल शर्मा मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. काजल शर्मा व फैजल खान यांच्यासह या चित्रपटात उदय टिकेकर, किशोरी शहाणे-वीज, मिलिंद गुणाजी, निशिगंधा वाड, समीरा गुजर, डॉ. विलास उजवणे, कौस्तुभ दिवाण, राकेश, वैष्णवी रणदिवे यांचाही समावेश आहे. जानेवारी अखेरीला ही ‘प्रेमकहाणी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 1:01 am

Web Title: kajal sharma and faisal khan in premkahani movie
Next Stories
1 ललित व नेहा उलगडणार लघुपट कथेचा प्रवास
2 आझादसाठी आमिर बनला ‘नाताळ बाबा’!
3 माझा संकल्प: पाणी बचत आणि स्वच्छ परिसर
Just Now!
X