बॉलिवूडमधील ज्या जोडीच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला ती म्हणजे शाहरुख खान आणि काजोल. दोघांच्या चित्रपटांना मिळणारी दाद ही काही वेगळीच असते. ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’ या चित्रपटापासून दोघांची केमिस्ट्री चर्चेत आली. शाहरुख-काजोलचा चित्रपट म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असते. ही जोडी आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे, ते सुद्धा एका सुपरहिट चित्रपटाच्या सिक्वलमधून.

हा चित्रपट आहे ‘हिंदी मिडियम’. इमरान खान आणि सबा कमर यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफीस गाजवलं होतं. त्याच्या सिक्वलमध्ये शाहरुख-काजोल झळकणार असल्याचं समजतंय. दिनेश विजन या चित्रपटाची निर्मिती करणार असून त्याचे चित्रीकरण अमेरिकेत होणार असल्याचं कळतंय. काजोल आणि शाहरुखने त्याची पटकथा वाचली असून चित्रपटात काम करण्यास दोघांनीही होकार दिल्याचं सांगण्यात आलं.

वाचा : स्वातंत्र्यदिनी प्रभास, अक्षय आणि जॉन मोठ्या पडद्यावर भिडणार

इरफानला कॅन्सरचे निदान होण्यापूर्वीच म्हणजेच, फेबु्रवारी २०१८ मध्ये ‘हिंदी मीडियम’च्या सिक्वलची घोषणा झाली होती. होमी अदजानिया हा चित्रपट दिग्दर्शित करणार असंही जाहीर करण्यात आलं होतं. पण इरफानच्या प्रकृतीमुळे हा चित्रपट लांबणीवर टाकण्यात आला होता.

निर्माते दिनेश विजन यांनी यापूर्वी ‘कॉकटेल’ आणि ‘फाइंडिंग फॅनी’साठीही काम केलं आहे. दरम्यान, दिनेश यांनी या ‘हिंदी मिडियम’च्या सिक्वलबाबत कोणतंही भाष्य केलेलं नाही. ‘हिंदी मीडियम’ हा देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा चित्रपट होता. भारत आणि चीन या दोन्ही देशात या चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती.