News Flash

मुलीला ट्रोल करणाऱ्यांवर भडकली काजोल

न्यासाच्या जागी तुमचे आई-वडिल किंवा कुटुंबीय असते तर तुम्ही काय केलं असतं?, असा सवाल तिने ट्रोलर्सना केला.

काजोल

अभिनेत्री काजोलची मुलगी न्यासा अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल होते. कधी तिच्या कपड्यांमुळे किंवा मग कधी तिच्या वागण्यामुळे न्यासा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. ‘ती सेलिब्रिटी किड असल्यामुळे तिला अशाप्रकारे ट्रोल केलं जातं’, असं म्हणत काजोलने संताप व्यक्त केला आहे. न्यासाच्या जागी तुमचे आई-वडिल किंवा कुटुंबीय असते तर तुम्ही काय केलं असतं असा सवाल काजोलने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रोलर्सना विचारला.

ट्रोलिंगविषयी ती म्हणाली, “ट्रोल करणाऱ्यांच्या डोक्यात कसला विचार असतो हे माहित नाही. हेच जर तुमच्या बहिणी किंवा आईच्या बाबतीत झालं असतं तर तुम्ही शांत बसाल का? ती जर सेलिब्रिटी किड नसती तर या ट्रोलिंगला तुम्ही छळवणूक म्हणणार नाही का? आजकाल तर अशा लोकांवर कारवाईसुद्धा केली जाते. ट्रोलिंग हे जरी नावं दिलं असलं तरी ती एक प्रकारची दादागिरीच आहे. ट्रोल करणारे मूर्ख असतात. त्यांना माहित नसतं की ते काय करतायत.”

आणखी वाचा : काजोलने सांगितली नऊवारी साडीतली ‘ती’ खास आठवण

याआधी अजयनेसुद्धा न्यासाच्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली होती. “सेलिब्रिटींची मुलं असल्याचा फटका त्यांनी का भोगावा? कधीकधी ते इतके लहान असतात की फोटोग्राफर्ससमोर कसं वागावं हे त्यांना नाही समजत. त्यांना मुक्त वावरण्याचं स्वातंत्र्य द्या,” असं तो म्हणाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 4:19 pm

Web Title: kajol gets angry on trollers who troll her daughter nyasa ssv 92
Next Stories
1 ‘थॉर’चा देसी अंदाज, व्हिडीओ झाला व्हायरल
2 ड्रायव्हरचे महिलेबरोबर गैरवर्तन, वरुण संतापला आणि…
3 CAA: राजकारणाचं भजं झालंय- मकरंद अनासपुरे
Just Now!
X