16 November 2018

News Flash

‘दिलवाले’नंतर शाहरुख- काजोल पुन्हा एकत्र

शाहरुख- काजोलसोबत राणीसुद्धा स्क्रीन शेअर करणार.

शाहरुख खान, काजोल

बॉलिवूडमधील ज्या जोडीच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला ती म्हणजे शाहरुख खान आणि काजोल. दोघांच्या चित्रपटांना मिळणारी दाद ही काही वेगळीच असते. आता पुन्हा एकदा काजोल शाहरुखसोबत झळकणार आहे. आनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’ या किंग खानच्या आगामी चित्रपटात काजोलचीही भूमिका आहे.

‘झिरो’मध्ये किंग खानसोबत कतरिना आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिका साकारणार आहेत. तर काजोल आणि राणी मुखर्जी पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत पाहायला मिळतील. राणीने शूटिंगचा अनुभव व्यक्त करताना ‘कुछ कुछ होता है २’साठी काम केल्यासारखे वाटल्याचे सांगितले. ‘कुछ कुछ होता है’ या सुपरहिट चित्रपटातील शाहरुख, राणी आणि काजोल यांच्यातील प्रेमाच्या त्रिकोणाला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली होती.

Aapla Manus Teaser : आपल्याला जमेल तेवढाच चांगुलपणा दाखवावा, आपण काय गांधी नाही, म्हणतोय ‘आपला मानूस’

‘आम्ही जवळपास अर्ध्या तासासाठी शूटिंग केले. पण शाहरुखसोबत काम करण्याचा अनुभव नेहमीच निराळा असतो,’ असे काजोलने म्हटले. ‘झिरो’ या चित्रपटात शाहरुख एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. ‘झिरो’मधील तगड्या स्टारकास्टमुळे बरीच चर्चा होत असताना बॉक्स ऑफीसवर त्याला कसा प्रतिसाद मिळेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. २१ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

First Published on January 12, 2018 4:34 pm

Web Title: kajol on uniting with shah rukh khan again after dilwale