28 September 2020

News Flash

सासऱ्यांच्या आठवणीत भावूक झालेली काजोल म्हणते…

काजोलने वीरु देवगण यांचा फोटो शेअर केला आहे

काजोल

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ‘फाईट मास्टर’ वीरु देवगण यांचे २७ मे रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांची सून आणि अभिनेत्री काजोल प्रचंड भावूक झाली आहे. काजोलने सोशल मीडियावर वीरु देवगण यांचा एक फोटो शेअर करुन एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

“आनंदाच्या काळामधील हा फोटो. त्यावेळी त्यांना लाइफटाइम अचिव्हमेंट अॅवॉर्ड मिळाला होता. मात्र त्यांना हे सिद्ध करण्यासाठी पूर्ण आयुष्य वाट पाहावी लागली. त्यांनी कायम मजेत आयुष्य व्यतीत केलं. त्यांच्या आत्मास शांती मिळो आणि प्रेम. वीरु देवगण यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी काम केलं. त्यांच्यामुळे आज कलाविश्वाला अनेक सुपरहिट अभिनेता मिळाले. कलाविश्वातील त्यांचं योगदान कायम उल्लेखनीय ठरेल”, असा मेसेज काजोलने पोस्ट केला.

काही दिवसांपूर्वी अजय देवगणने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून वडीलांच्या आठवणींना उजाळा दिल्याचं पाहायला मिळालं. “वीरु देवगण हे खऱ्या अर्थाने सिंघम होते. त्यांनी अत्यंत कमी पैशामध्ये मुंबई गाठली होती आणि करिअरची सुरुवात केली होती. प्रचंड मेहनत आणि विश्वासावर त्यांनी त्यांचं करिअर घडविलं होतं. टॅक्सी धुण्याचं कामदेखील त्यांनी केलं होतं”.

दरम्यान, वीरु देवगण यांच्या निधनाबाबत अभिनेता अमिताभ बच्चन यांनीदेखील शोक व्यक्त केला. त्यांनी ब्लॉगवर एक जुना किस्सा लिहित, वीरु देवगण यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2019 11:37 am

Web Title: kajol pens an emotional note for father in law veeru devgan
Next Stories
1 सलमानच्या ‘भारत’ची पहिल्याच दिवसात दणक्यात कमाई
2 ‘तुला पाहते रे’ मालिकेनंतर काय असेल गायत्रीचा प्लान?
3 प्रविण तरडेंच्या ‘सरसेनापती हंबीरराव’चे पोस्टर पाहिलेत का?
Just Now!
X