News Flash

…आणि काजोल तोंडावर पडली!, ‘कुछ कुछ होता है’च्या शूटिंगचा भन्नाट व्हिडीओ काजोलने केला शेअर

करण जोहर आणि मनीष मल्होत्राची मजेशीर कमेंट

आज जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने अनेक जण सायकलिंगचं महत्व सांगतं आहेत. मात्र आजच्या या खास दिवसाच्या निमित्ताने अभिनेत्री काजोलने एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. १९९८ सालामध्ये आलेल्या काजोल आणि शाहरुख खानच्या ‘कुछ कुछ होता है’ सिनेमातील एका व्हि़डीओची क्लिप काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिलाय.

काजोलने हा व्हिडीओ शेअर करत ” तुम्हाला ही जागतिक सायकल दिनाच्या शुभेच्छा” असं कॅप्शन दिलंय. ‘कुछ कुछ होता है’ सिनेमातील ‘ये लडका है दिवाना’ या गाण्याच्या शूटिंगच्या वेळेचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत शाहरुख खान आणि काजोल सायकल चालवताना दिसत आहेत. यात सायकल चालवणाऱ्या शाहरुखच्या वाटेला जाणं काजोलच्या महागात पडल्याचं दिसतंय. काजोल सायकल चालवत असतानाच शाहरुखला कट मारण्याता प्रयत्न करते आणि थेट तोंडावर पडताना दिसतेय. काजोलने शेअर केलाला हा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. करण जोहर आणि मनिष मल्होत्राने व्हिडीओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

आणखी वाचा: “तो मोफत जेवण पुरवतोय याबद्दल कुणी का लिहित नाही”; टायगर श्रॉफच्या आईने व्यक्त केली नाराजी

करण जोहर आणि मनीष मल्होत्राची मजेशीर कमेंट

काजोलच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात ‘कुछ कुछ होता है’ सिनेमाचं दिग्दर्शन करणारा आणि काजोलचा जवळचा मित्र करण जोहरने कमेंट केली आहे. “अरे देवा हे चांगलं लक्षात आहे आणि त्यानंतर काय झालं हे तर विसरूच शकत नाही.”अशी कमेंट करणने केलीय.  तर फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने देखील या व्हिडीओवर कमेंट केली आहे. “आठवतंय ..आम्ही सगळे लगेच तुझ्या दिशेने धावत आलो होतो. पण तू ज्या गाण्यांमध्ये पडली आहेस ती सगळी हीट झाली आहेत” अशी मेजेशीर कमेंट मनीषने केली आहे.

आणखी वाचा : “भयानक डान्सर आहे”, नव्या डान्स व्हिडीओमुळे ‘दिया और बाती’ फेम दीपिका सिंह पुन्हा ट्रोल

काजोलची तात्पुरती स्मृती गेली होती

सिनेमातून हा सीन वगळण्यात आलाय. मात्र सायकलवरून पडल्यामुळे काजोलची तात्पुरती स्मृती गेली होती. काजोल सायकलिंगमध्ये अजिबात चांगली नाही असं शाहरुख खान एका मुलाखतीत म्हणाला होता. ” आम्ही सायकल चालवताना हात मोकळे ठेवणं अपेक्षित होतं. पण काजोल अचावक चेहऱ्यावरच पडली. ती आमच्याकडे बघून हसू लागली त्यामुळे मग सहाजिकच आम्ही देखील ती पडली म्हणून हसू लागले.” पुढे तो म्हणाला, “काजोलच्या पायाला खरचटलं होतं आणि तिला काही आठवतं नव्हत तेव्हा आम्ही थोडे गंभीर झालो. तिला काही काळासाठीचा स्मृतिभ्रंश झाला नशीबाने तिला अजय देवगण लक्षात होता.” असं म्हणत शाहरुखने मजेशीर प्रतिक्रिया दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 2:40 pm

Web Title: kajol share hilarious unseen video from kuch kuch hota hai where kajol fell on her face leading to a temporary memory loss kpw 89
Next Stories
1 ‘भूतकाळ विसर कारण…’, आशुतोषने तेजश्रीसोबत शेअर केलेल्या फोटोवरुन चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण
2 “तो मोफत जेवण पुरवतोय याबद्दल कुणी का लिहित नाही”; टायगर श्रॉफच्या आईने व्यक्त केली नाराजी
3 सलमान आणि केआरकेच्या भांडणात गोविंदाला खेचले, संतप्त प्रतिक्रिया देत म्हणाला…
Just Now!
X