News Flash

काजोलचा मुलगा ‘ब्रह्मास्त्र’साठी करण जोहरसोबत करणार काम

'धर्मा प्रॉडक्शन्स'चा हा सर्वांत मोठा प्रोजेक्ट आहे.

'धर्मा प्रॉडक्शन्स'चा हा मोठा प्रोजेक्ट आहे

‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात काजोल आणि शाहरुख खानच्या मुलाची भूमिका साकारलेला चिमुकला क्रिश तुम्हाला आठवतोय का? हाच मुलगा आता मोठा झाला असून इंडस्ट्रीमध्ये कामाच्या शोधात आहे. जिब्रान खान असं त्याचं नाव असून ‘कभी खुशी कभी गम’चा दिग्दर्शक करण जोहरच आता त्याचा मार्गदर्शक होणार आहे.

एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार जिब्रान करणच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शकाचं काम करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ‘धर्मा प्रॉडक्शन्स’चा हा सर्वांत मोठा चित्रपट असून त्याचं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून जिब्रानची वर्णी लागली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी करणार असून रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाच्या टीमसोबत जिब्रानने कामालाही सुरुवात केल्याचं म्हटलं जात आहे.

वाचा : आमिर- अजयसोबत ‘हा’ कपूरसुद्धा तुमच्या भेटीला येतोय 

जिब्रानला अभिनय क्षेत्रात रस असून चित्रपटात भूमिका साकारण्याची इच्छा आहे. त्यासाठी त्याने मार्शल आर्ट्स, कथ्थक आणि घोडेस्वारीसुद्धा शिकला आहे. इतकंच नाही तर कोरिओग्राफर शामक दावरच्या डान्स स्टुडिओमध्ये त्याने नृत्य प्रशिक्षक म्हणूनही काम केलं आहे. जिब्रानने करण जोहरला चित्रपटातील एका भूमिकेसाठी विचारणा केली असल्याचीही माहिती आहे. मात्र, त्यासाठी तो पूर्णपणे तयार झाला नसल्याचं सांगत करणने सहाय्यक दिग्दर्शनाचं काम त्याच्याकडे सोपवलं.

‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून करणने ट्विटरवरून या चित्रपटाची घोषणा केली होती. याच्या चित्रीकरणाला पुढच्या वर्षी सुरूवात होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2017 8:45 pm

Web Title: kajol son is now karan johar chief assistant director for brahmastra
Next Stories
1 आमिर- अजयसोबत ‘हा’ कपूरसुद्धा तुमच्या भेटीला येतोय
2 ‘फास्टर फेणे’ हा माझ्या हृदयाजवळचा चित्रपट- रितेश देशमुख
3 रोहित शेट्टीला का वाटतेय आमिरची भीती?
Just Now!
X