मालिका, वेब सीरिज या साऱ्या गर्दीत गेल्या काही दिवसांपासून एक नाव प्रचंड चर्चेत आहे ते म्हणजे भाडिपाचं. भाडिपा म्हणजे भारतीय डिजीटल पार्टी. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध संकल्पनांना विनोदाची जोड देत सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केलं जातं. काही दिवसापूर्वी कार्यक्रमामध्ये स्टँडअप कॉमेडियन अबिश मॅथ्यूने सहभाग घेतला. त्यानंतर आता अभिनेत्री काजोलने भाडिपाच्या सेटवर उपस्थिती दर्शविल्याचं दिसून येत आहे.

भाडिपाने अवघ्या काही काळातच प्रचंड लोकप्रियता मिळविली असून नुकत्याच झालेल्या भागात काजोलने हजेरी लावली होती. यावेळी तिने चक्क मराठीमध्ये संपूर्ण संभाषण केल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे कुठेही न अडखळता काजोल बोलत होती. यावेळी काजोलने अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं असून चित्रपटसृष्टीतील कास्टिंग काऊचविषयीही तिने वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, काजोलच्या बोलण्यातून तिचं मराठी भाषेवर असलेलं प्रेम दिसून आलं. कलाविश्वामध्ये नव्या कलाकारांची निवड करताना वर्णभेद होतो का ? असा प्रश्न काजोलला विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देत ‘आपली माती, आपली माणसं असं’ म्हणतं तिने कलाविश्वातील एक बाजू समोर आणली आहे.

‘सध्याच्या काळात रंगावरुन माणसाची पारख होत नाही. तर ती वक्तीच्या कामावरुन त्याची निवड होत असते. तसंच कालाविश्वातही आहे. विशेष म्हणजे सावळ्या रंगाच्या व्यक्ती या अधिक उठून दिसतात’, असं काजोल म्हणाली.