News Flash

साडेचार वर्षांची असताना माझे आई-वडील विभक्त झाले, काजोलने सांगितल्या लहानपणीच्या आठवणी

तिने एका शोमध्ये हा खुलासा केला आहे.

महत्त्वाचं म्हणजे काही कलाकरांना बालपणीच कुटुंब विखुरण्याचं दु:ख सहन करावा लागलं. अशाच काही कलाकारांबद्दल जाणून घेऊया.

बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा ‘त्रिभंग’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात एखाद्या कुटुंबाला कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीमध्ये काजोलने तिच्या खासगी आयुष्यावरही वक्तव्य केले आहे. तिने तिच्या आई-वडीलांच्या घटस्फोटावरही वक्तव्य केलं आहे.

‘कोईमोई’ने दिलेल्या वृत्तानुसार, काजोलने नेटफ्लिक्सवरील ‘बेहेन्सप्लॅनिंग’ या शोमध्ये तिच्या आई-वडीलांच्या विभक्त होण्यावर वक्तव्य केलं आहे. “साधारणपणे जेव्हा मी साडेचार वर्षांची होते तेव्हा माझे आई-वडील विभक्त झाले. यात चुकीचे असे काही नाही. माझे असे बरेच मित्र-मैत्रिणी आहेत ज्यांचे आई-वडील आजही एकत्र आहे. पण त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आहे. त्यामुळे त्यांचे बालपण खूप छान असे नव्हते. माझे माझ्या आई आणि वडीलांवर ते एकत्र असतानाही प्रेम होते आणि विभक्त झाल्यावर सुद्धा आहे” असे काजोल म्हणाली.

आणखी वाचा- खऱ्या आई-वडिलांविषयी जाणून घेण्याची इच्छा आहे का? सुष्मिताच्या मुलीला प्रश्न विचारताच म्हणाली..

पुढे ती म्हणाली, “माझे बालपण खूप छान होते. माझे संगोपण अशा व्यक्तींनी केलं आहे ज्यांचे विचार खूप चांगले आहेत. ते व्यक्ती म्हणून खूप चांगले आहेत. त्यांनी मला आयुष्य काय आहे हे शिकवले. मी स्वत:ला भाग्यवान समजते.”

Video: गायिका प्रियांका बर्वेच्या चिमुकल्याची कमाल; आईला दिली गाण्यात साथ

‘त्रिभंग’ या चित्रपटात काजोल सोबत अभिनेत्री तन्वी आझमी आणि मिथिला पालकर मुख्य भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट १५ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला प्रेक्षकांचा चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर सगळ्यात जास्त पाहिला जाणारा चित्रपट ठरला असल्याचे म्हटले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 1:28 pm

Web Title: kajol talked about her parents separation dcp 98 avb 95
Next Stories
1 ५० लाख रुपयांच्या प्रश्नाला स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्ही देऊ शकाल का उत्तर?
2 Birthday Special: नम्रता शिरोडकरने ‘या’ कारणासाठी सोडले होते फिल्मी करिअर
3 म्हणून प्रियांका अमेरिकेतून पळून आली होती भारतात
Just Now!
X