27 November 2020

News Flash

म्हणून काजोल मुलीसोबत राहणार सिंगापूरमध्ये

जाणून घ्या कारण...

सध्या करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेकजण घरात आहेत. स्वत:ची योग्य काळजी घेत आहेत. अशातच अजय देवगणीची मुलगी न्यासा सिंगापूरमध्ये शिक्षण घेत होती. पण करोनामुळे न्यासा मार्च महिन्यात घरी परतली. आता न्यासाला शिक्षणासाठी पुन्हा सिंगापूरला जावे लागणार आहे. त्यामुळे काजोलने न्यासासोबत सिंगापूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे.

काजोल पुढचे काही दिवस न्यासासोबत सिंगापूरमध्ये राहणार असल्याचे ‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. ‘न्यासा सिंगापूरमधील United World College of South East Asia येथे शिक्षण घेत आहे. न्यासाने तिचा अभ्यास बुडवू नये असे कजोल आणि अजयला वाटत आहे. पण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे न्यासाला परदेशात एकटीला पाठवता येत नाही. म्हणून आता काजोलने पुढचे काही दिवस न्यासासोबत सिंगापूरमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. २०१८मध्ये अजय देवगणने न्यासाला राहण्याठी तेथे अपार्टमेंट खरेदी केली आहे’ अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

काजोल सिंगापूरला जाणार असल्यामुळे पुढचे काही दिवस अजय मुलासोबत वेळ घालवणार आहे. त्याचबरोबर त्याच्या चित्रपटांचे चित्रीकरण सुरु ठेवणार आहे. लवकरच तो ‘मैदान’, ‘गोलमाल ५’, ‘भूज’ या चित्रपटात दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 2:41 pm

Web Title: kajol to stay with daughter nysa in singapore owing of covid 19 avb 95
Next Stories
1 VIDEO : चहलच्या होणाऱ्या पत्नीचा ‘मुकाबला’ डान्स हिट
2 “तुझं डोकं ठिकाणावर आहे का?” विचित्र फोटोमुळे अभिनेत्रीला केलं जातंय ट्रोल
3 विराट-अनुष्कानंतर ‘ही’ अभिनेत्री देणार गूडन्यूज?
Just Now!
X