आज अभिनेता, निर्माता अजय देवगणचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने बॉलिवूड त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. त्याची पत्नी आणि अभिनेत्री काजोल हिनेही अजयला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र एका खास अंदाजात….यावेळी तिने तिची एक खंत बोलून दाखवली आहे. जाणून घेऊ काय म्हणाली आहे काजोल!
काजोलचा पती अजयचा ५२ वा वाढदिवस. आजच्या या खास दिवसानिमित्त तिने त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला पण तो आजही कामात असल्याने तिला त्याच्यासोबत सेल्फी काढता आला नाही. शेवटी तिला अजयच्या कॅमेऱ्यासोबतच्या फोटोवरच समाधान मानावं लागलं.
पती अजयला शुभेच्छा देत तिने त्याचा हा फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, “सेल्फी घेण्याचा खूप प्रयत्न केला पण फोटो मिळाला तो त्याचा आणि कॅमेऱ्याचा…..त्याला आनंद मिळणारी गोष्ट करत आहे. वाढदिवसाच् शुभेच्छा…आज आणि कायम!”

काजोल आणि अजय १९९९ साली लग्नबंधनात अडकले. ते बॉलिवूडमधल्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांचाही चाहतावर्ग मोठा आहे. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. चाहत्यांनीही या जोडीला अक्षरशः डोक्यावर घेतलं. इश्क, प्यार तो होना ही था, तान्हाजी हे या जोडप्याचे काही गाजलेले चित्रपट.
काजोलची बहीण आणि अजयची मेहुणी तनिशा मुखर्जीनेही अजयला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने अजयसोबतचे काही जुने फोटो शेअर केले आहेत.