News Flash

गणपती आणि ईद यांचा संबंध जोडल्याने अभिनेत्री काजोलवर भडकला तरूण

पुढे जे होईल त्याची पूर्ण जबाबदारी तुमचीच असेल

काजोल

देशभरात गणपतीचा उत्साह पाहवयास मिळतोय. यावेळी गणपती आणि ईद हे दोन्ही सण एकत्रच आले आहेत. या दोन्ही सणांबद्दल बॉलिवूड अभिनेत्री काजोलने एक ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. एकीकडे काजोलच्या या ट्विटचे कौतुक होताना दिसत आहे तर दुसरीकडे काही ट्विटरकर मात्र तिच्या या ट्विटमुळे नाराज झाले आहेत. एका युझरने तर काजोलला धमकीच दिली.

अभिषेकसोबत लग्न केल्याचा दावा करणारी ‘ती’ येणार ‘बिग बॉस ११’ मध्ये?

आज अनेक ठिकाणी मुस्लिम बांधव बकरी ईद हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत आहेत. काजोलने या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी ट्विट करत म्हटले की, ‘जर आपले देव गणेशोत्सव आणि ईद हे दोन सण एकत्र साजरा करु शकतात तर आपण का नाही?’

काजोलचे हे ट्विट ज्यांना पसंत पडले त्यांनी कमेंटमध्ये काजोलला गणेशोत्सव आणि ईद या दोन्ही सणांच्या शुभेच्छा दिल्या. ‘तुम्ही जे बोलता ते अगदी खरं आहे, प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट कळली पाहिजे जेणेकरुन जगातील नकारात्मकता नष्ट होईल.’ अशा प्रतिक्रियाही तिला मिळत होत्या.

तर दुसरीकडे ज्यांना काजोलचे हे ट्विट आवडले नाही त्यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या. अली इमराना या व्यक्तीने तर काजोलला धमकी देत म्हटले की, ‘तुम्ही आमच्या अल्लाहची तुमच्या देवाशी तुलना करु नका.’ तसेच काजोलला तिचे हे ट्विट डीलीट करण्याची धमकीही दिली.

‘तुम्ही फार मोठी चूक करत आहात. तुमचं हे ट्विट खूप मोठा वाद निर्माण करेल.’, एवढंच बोलून तो थांबला नाही तर अजून एक ट्विट करत त्याने म्हटले की, ‘मी तुम्हाला ही शेवटची संधी देतोय. पुढे जे होईल त्याची पूर्ण जबाबदारी तुमचीच असेल.’ अलीच्या या धमक्यांना काजोल अजिबातच घाबरली नाही. उलट तिने त्याच्या धमक्यांकडे पूर्णपणे कानाडोळा केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 4:56 pm

Web Title: kajol trolled by some muslim twitterati for wishing eid and ganpati puja together
Next Stories
1 अभिषेकसोबत लग्न केल्याचा दावा करणारी ‘ती’ येणार ‘बिग बॉस ११’ मध्ये?
2 ढोल-ताशांच्या गजरात सरस्वती करणार बाप्पाचे विसर्जन
3 अक्षय कुमार या दाक्षिणात्य सिनेमाच्या रिमेकमध्ये दिसणार
Just Now!
X