News Flash

बिग बी आणि कमल हसन यांच्यासोबतच्या फोटोमुळे काजोल ट्रोल

सोशल मीडिया आणि ट्रोल हे जणू काही आता समीकरणच तयार झालं आहे. एखादी व्यक्ती सोशल मीडियावर कोणत्या कारणासाठी ट्रोल होऊ शकते याचा आजकाल काही नेम

Kajol
काजोल

सोशल मीडिया आणि ट्रोल हे जणू काही आता समीकरणच तयार झालं आहे. एखादी व्यक्ती सोशल मीडियावर कोणत्या कारणासाठी ट्रोल होऊ शकते याचा आजकाल काही नेम नाही. सेलिब्रिटींच्या बाबतीत हे बऱ्याचदा घडताना दिसतं. कधी फोटोवरून तर कधी त्यांच्या पोस्टवरून सेलिब्रिटी अनेकदा ट्रोल होताना दिसतात. अभिनेत्री काजोलने तिच्या ट्विटर अकाऊंटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला. याच फोटोमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

शुक्रवारी कोलकातामध्ये २३व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (KIFF) सुरुवात झाली. या महोत्सवाला अमिताभ बच्चन, शाहरूख खान, महेश भट्ट, कमल हसन, काजोल यांसारखे कलाकार उपस्थित होते. यावेळी बिग बी आणि कमल हसन यांच्यासोबतचा एक फोटो काजोलने ट्विटरवर पोस्ट केला. ‘दोन महानायकांसोबत सेल्फी..,’ असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं. या कॅप्शनवरूनच नेटकऱ्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.

Padmavati new poster: अल्लाउद्दीन खिल्जीचा राजेशाही थाट

बिग बी आणि कमल हसन यांच्यासोबत काढलेल्या फोटोला काजोलने चुकून सेल्फी म्हटलं. यावर काही चाहत्यांनी तिलाच उलट प्रश्न विचारला की हा सेल्फी आहे का?, तर काहींनी तिची खिल्ली उडवली. ‘तुझे दोन्ही हात त्यांच्या मागे (कमरेवर) आहेत, तर तू सेल्फी कसा काढलास?’ असाही उपरोधिक सवाल एका नेटकऱ्याने केला. त्यामुळे चुकीचं कॅप्शन काजोलला चांगलंच महागात पडलं असं म्हणायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2017 8:29 pm

Web Title: kajol trolled for her picture with amitabh bachchan and kamal haasan
Next Stories
1 Padmavati new poster: अल्लाउद्दीन खिल्जीचा राजेशाही थाट
2 PHOTO : ‘राझी’मध्ये आलियाचा काश्मिरी अंदाज
3 ‘पद्मावती’ची कथा ‘अनारकली’ इतकीच काल्पनिक- जावेद अख्तर
Just Now!
X